एक्स्प्लोर

मुकेश अंबानी आणखी श्रीमंत, फक्त 120 तासात कमावले 39,311.54 कोटी रुपये, संपत्तीत झाली मोठी वाढ

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी. त्यांच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. या आठवड्यात मुकेश अंबानींच्या संपत्तीत तब्बल 39,311.54 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Mukesh Ambani : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी. त्यांच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. या आठवड्यात मुकेश अंबानींच्या संपत्तीत तब्बल 39,311.54 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. पाच दिवसात मोठा संपत्ती मिळाल्यामुळं मुकेश अंबानी आणखी श्रीमंत झाले आहेत. 

सोमवार ते शुक्रवार या 5 दिवसांत (120 तास) रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 17,27,339.74 कोटी रुपयांनी वाढले आहे. ती देशातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. यानंतर या यादीत एचडीएफसी बँक, टाटा समूहाची टीसीएस, भारती एअरटेल यासारख्या कंपन्या आहेत.

कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ

गेल्या आठवड्यात, बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 3,076.6 अंकांनी किंवा 4.16 टक्क्यांनी वाढला, तर NSE निफ्टी 953.2 अंकांनी किंवा 4.25 टक्क्यांनी वधारला. शुक्रवारी कंपनीचा समभाग रु. 1,277.50 वर बंद झाला. रिलायन्ससह टॉप 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांचे एकूण मूल्यांकन या आठवड्यात 3,06,243.74 कोटी रुपयांनी वाढले. यामध्ये आयसीआयसीआय आणि भारती एअरटेलने सर्वाधिक नफा कमावला. हे या आठवड्यात देशांतर्गत शेअर बाजारात दिसलेल्या जबरदस्त वाढीच्या अनुषंगाने आहे.

जगातील श्रीमंतीच्या बाबतीत मुकेश अंबानींचा 18 वा क्रमांक  

फोर्ब्सच्या मते, मुकेश आणि अंबानी यांची रिअल-टाइम नेट वर्थ US $ 95.5 बिलियन आहे. 23 मार्च रोजी ते जगातील 18 व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. तो आपल्या व्यवसायाची व्याप्ती सतत वाढवत आहे. अलीकडे, रिलायन्स समूहाची उपकंपनी स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड ने नौयान ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड (NTPL) मार्फत वेलस्पन कॉर्प लिमिटेडकडून नौयान शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड (NSPL) मध्ये 382.73 कोटी रुपयांना 74 टक्के हिस्सा विकत घेतला. दिवसेंदिवस मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भाग भांडवल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शेअर मार्टेमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये देखील वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ होत आहे. 

2023 पासून मुकेश अंबानी यांची तिन्ही मुले रिलायन्स ग्रुपचे वेगवेगळे व्यवसाय सांभाळत आहेत. मुलगी ईशा अंबानी रिलायन्स ग्रुपचा रिटेल, ई-कॉमर्स आणि लक्झरी व्यवसाय सांभाळते. धाकटा मुलगा अनंत अंबानी ऊर्जा क्षेत्राशी संबंधित व्यवसायांवर देखरेख करतो. मोठा मुलगा आकाश अंबानी भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओचा प्रमुख आहे.

महत्वाच्या बातम्या:

RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 

महत्त्वाच्या बातम्या

बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
दारुचे भाव दहा पटीने वाढवा, साखरेचे भाव निम्म्यावर आणा, माजी मंत्र्याची अजब मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र
दारुचे भाव दहा पटीने वाढवा, साखरेचे भाव निम्म्यावर आणा, माजी मंत्र्याची अजब मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget