BCCI Central Contract 2025 : बीसीसीआयकडून वार्षिक करार जाहीर, 'या' 16 खेळाडूंना लागली लॉटरी, कुणाला झटका? जाणून घ्या A टू Z
BCCI announces womens central contracts for 2024-25 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2024-25 या वर्षासाठी महिला क्रिकेटपटूंची नवीन करार यादी जाहीर केली आहे.

BCCI Central Contract 2025 List Players : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2024-25 या वर्षासाठी महिला क्रिकेटपटूंची नवीन करार यादी जाहीर केली आहे. यावेळी बीसीसीआयने टीम इंडियाच्या 16 महिला खेळाडूंना वार्षिक केंद्रीय करार देण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंच्या केंद्रीय कराराची यादी तीन श्रेणींमध्ये विभागली आहे. 16 पैकी 3 खेळाडूंना ग्रेड ए मध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याच वेळी, 4 खेळाडूंनी ग्रेड बी मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. याशिवाय 9 खेळाडूंना ग्रेड सी मध्ये स्थान देण्यात आले आहे. हा करार 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिलेल्या अधिकृत मीडिया रिलीजमध्ये असे म्हटले आहे की, “भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2024-25 हंगामासाठी खेळाडूांचा वार्षिक करार जाहीर केले आहेत.”
🚨 News 🚨
— BCCI Women (@BCCIWomen) March 24, 2025
BCCI announces annual player retainership 2024-25 - Team India (Senior Women)#TeamIndia pic.twitter.com/fwDpLlm1mT
बीसीसीआयकडून वार्षिक करार जाहीर
बीसीसीआयने यंदाच्या करारात कर्णधार हरमनप्रीत व्यतिरिक्त स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांना ग्रेड ए श्रेणीमध्ये स्थान दिले आहे. तर 4 खेळाडूंना ब श्रेणीत स्थान मिळाले आहे. या 4 खेळाडूंमध्ये रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष आणि शफाली वर्मा यांचा समावेश आहे. याशिवाय, यास्तिका भाटिया, राधा यादव, श्रेयंका पाटील, तीतस साधू, अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर, उमा छेत्री, स्नेहा राणा आणि पूजा वस्त्रकर यांना ग्रेड सी मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोशल मीडियावर पोस्ट करत याची घोषणा केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्रेड ए मध्ये समाविष्ट असलेल्या हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी 50 लाख रुपये मिळतील. तर, रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष आणि शेफाली वर्मा यांना प्रत्येकी 30 लाख रुपये दिले जातील. याशिवाय, ग्रेड सी मध्ये समाविष्ट असलेल्या सर्व 9 खेळाडूंना दरवर्षी प्रत्येकी 10 लाख रुपये मिळतील.
'या' खेळाडूंना झटका!
या वर्षी मेघना सिंग, देविका वैद्य, शब्बिनेनी मेघना, अंजली सरवाणी आणि हरलीन देओल यांना केंद्रीय करार मिळण्यापासून वंचित राहावे लागले. हरलीन देओलने नुकतेच वडोदरा येथील कोट्टांबी स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध तिचे पहिले एकदिवसीय शतक झळकावले. त्यानंतर त्याने आयर्लंडविरुद्ध 89 धावांची शानदार खेळी खेळली.
एकदिवसीय वर्ल्ड कपची तयारी
भारतीय महिला क्रिकेट संघ श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेत सहभागी होऊन घरच्या मैदानावर होणाऱ्या आगामी एकदिवसीय वर्ल्ड कपची तयारी करेल. या मालिकेतील तिसरा संघ दक्षिण आफ्रिकेचा असेल. ही मालिका एप्रिल ते मे दरम्यान खेळवली जाईल. मालिकेतील सर्व सामने कोलंबोतील आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील.
सप्टेंबरमध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप होण्याची दाट शक्यता आहे. स्पर्धेचे सामने विजाग, पंजाब, मुल्लानपूर, इंदूर, तिरुवनंतपुरम आणि गुवाहाटी येथे होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला जिथे भारतीय क्रिकेटशी संबंधित अनेक अजेंड्यावर चर्चा करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
