एक्स्प्लोर
PHOTO | IAS सुनील केंद्रेकर यांचा साधेपणा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

1/5

आज (16 जानेवारी) सकाळी केंद्रकर खुलताबाद येथे गेले असताना त्यांना बाजार दिसला आणि त्यांनी पत्नीसोबत बाजार केला. विशेष म्हणजे त्याच्यासोबत कोणताही सुरक्षारक्षक सुद्धा नव्हता. त्यामुळे केंद्रेकर यांचा पुन्हा एकदा साधेपणा समोर आला आहे.
2/5

आता आठवडी बाजारात पत्नीसोबत बाजार करतानाचे त्यांचे फोटो समोर आले आहेत. ज्यात बाजाराची पिशवी स्वतःच्या खांद्यावर घेताना केंद्रेकर दिसत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील बाजारातील हे फोटो आहेत.
3/5

आपल्या साधेपणामुळे ओळखले जाणारे सनदी अधिकारी सुनील केंद्रकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आठवडी बाजारात जाऊन स्वतः बाजार केला. इतकंच नाही जर खरेदी केल्यानंतर पिशवी खांद्यावर घेऊन ते निघाले. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
4/5

शेतकरी कुटुंबातील केंद्रकर हे नेहमी आपल्या कडक शिस्तीच्या आणि सामान्यांसाठी निर्णय घेणारे अधिकारी म्हणून चर्चेत असतात. त्यामुळे त्यांची नेहमीच चर्चा असते.
5/5

अधिकारी म्हटलं की नेहमी एसी कार्यालय, अलिशान गाड्या, हाताखाली नोकर-चाकर असे चित्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. एवढंच नाही तर तलाठी सुद्धा बाजरात गेले तर सोबत पिशवी पकडण्यासाठी कोतवाल असल्याचं अनेकदा पाहायला मिळतात. मात्र असे असतानाही केंद्रेकर यांच्यासारखे अधिकारी किंचितवेळा पाहायला मिळतात.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
पुणे
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion