संसदेच्या नव्या इमारतीसोबतच सर्व मंत्रालयं एकत्रित आणण्यासाठी सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टही मोदी सरकारच्या अजेंड्यावर आहे. त्यामुळे राजधानीचं सगळं रंगरुपच बदलून जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं सध्या सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट आणि नव्या संसदेच्या बांधकामाला स्थगिती दिली आहे.
2/6
नवी संसद जुन्या संसदेप्रमाणे गोलाकार नसून त्याचा आकार त्रिभूज स्वरुपाचा असेल.
3/6
नव्या संसद भवनच्या सभागृहात लोकसभेच्या सदस्यांसाठी 888 सीट असतील. याशिवाय राज्यसभा सदस्यांसाठी 326 हून अधिक सीट असणार आहेत. संयुक्त बैठकीसाठी 1224 सदस्यांची बसण्याची व्यवस्था देखील असेल. याशिवाय प्रत्येक सदस्यासाठी 400 स्क्वेअर फूटचे स्वतंत्र कार्यालयही या नवीन इमारतीत असेल.
4/6
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचे भूमिपूजन करण्यात आलं आहे. जवळपास 80 वर्षांनी देशात नवं संसद भवन निर्माण करण्यात येणार आहे.
5/6
शास्त्री भवनजवळ रिकाम्या जागेवर नवीन संसदेची इमारत उभारण्यात येणार आहे. सुमारे 64500 चौरस मीटर जागेवर ही इमारत तयार होणार आहे. जुन्या संसदेपेक्षा नवीन संसद सुमारे 17 हजार चौरस मीटर मोठे आहे. यासाठी सुमारे 971 कोटी रुपये खर्च येणार आहे.
6/6
ऑक्टोबर 2022 पर्यंत नव्या संसद इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचं मोदी सरकारचं ध्येय आहे. जेणेकरुन देशाचा 75वा स्वातंत्र्य दिवसाचं आयोजन या संसद इमारतीमध्ये करण्यात येईल. ही इमारत पुढील 100 वर्षांची गरज लक्षात घेऊन तयार करण्यात येणार आहे