Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Dombivli News : डोंबिवलीतील देवीचापाडा परिसरात एक थरारक घटना घडल्याचे समोर आले आहे. यात चक्क 13 व्या मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून दोन वर्षांचा चिमुरडा खाली पडल्याची घटना घडली.
डोंबिवली : डोंबिवलीतील देवीचापाडा परिसरात एक थरारक घटना घडल्याचे समोर आले आहे. यात चक्क 13 व्या मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून दोन वर्षांचा चिमुरडा खाली पडल्याची घटना घडली. मात्र चिमुरडा खाली पडत असल्याचे दिसताच या इमारतीत राहणाऱ्या भावेश म्हात्रे नावाच्या तरुणाचे अचानक लक्ष गेलं आणि त्याने जीवाची पर्वा न करता चिमुरड्याला वाचवण्यासाठी झेप घेतलीय. दरम्यान हा चिमुरडा त्याच्या हातावर आला आणि नंतर तो पायावर पडला. यात चिमुकला किरकोळ जखमी झालाय. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे.
दैव बलवत्तर म्हणून....
एखाद्या सिनेमातला सीन वाटावा असाच प्रसंग आज(26 जानेवारीला) डोंबिवलीतील देवीचापाडा परिसरात घडला आहे.या परिसरात असलेल्या 13 व्या मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून एक दोन वर्षांच्या चिमुरड्याचा अचानक तोल गेला आणि त्यात तो खाली पडला. मात्र ही घटना घडली त्याच परिसरात असलेल्या भावेश म्हात्रे नावाच्या तरुणाला हा चिमुकला खाली पडताना दिसला. दरम्यान ते त्याच्या कडे धावले आणि जीवाची पर्वा न करता चिमुरड्याला वाचवण्यासाठी झेप घेतली दरम्यान हा चिमुरडा त्याच्या हातावर आणि नंतर पायावर पडला. दैव बलवत्तर म्हणून हा चिमुकला किरकोळ जखमी झाला. मात्र सुदैवाने त्याचा जीव यात वाचला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असाच काहीसा प्रकार या ठिकाणी घडला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या