Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओ
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त कृतीने राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत. चांदेरे (Baburao Chandere) यांनी पुण्यात एका काल (शनिवारी, ता 25) नागरिकाला मारहाण केल्याची माहिती संतापजनक घटना समोर आली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता, मारहाण झालेल्या व्यक्तीला डोक्यावर आणि गुडघ्याला जखम झाली होती, त्यानंतर आता या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. बाबुराव चांदेरे (Baburao Chandere) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वारंवार मारहाण आणि शिवीगाळ या घटनामुळे बाबुराव चांदेरे (Baburao Chandere) चर्चेत येतात.
कोण आहेत बाबुराव चांदेरे?
बाबुराव चांदेरे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन टर्म नगरसेवक राहिले आहेत. अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे. कबड्डी क्षेत्रात गेली 35 ते 40 वर्षाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे, त्यांच्यावर राज्य कबड्डी संघटनेच्या सरकार्यवाह पदाची जबाबदारी आहे.दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, 1986 मध्ये त्यांच्या लग्नानंतर त्यांनी त्यांचे सासरे मारुतराव धनकुडे यांच्यासोबत राजकारणात प्रवेश केला. त्यांचे सासरे शरद पवार यांच्या जवळचे असल्याने बाबूरावांना राजकारण समजलं. काम करत असतानाच चांदेरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आले. कब्बडी प्रेमी असल्याने त्याने खेळातही मोठे योगदान दिले आहे. सतेज कबड्डी संघाची स्थापना त्यांनी केली आहे. सध्या पुण्यात बाबुराव चांदेरे (Baburao Chandere) सोशल फाउंडेशन आणि बाणेर संघ कबड्डी खेळतात. त्यांचा मुलगा समीर चांदेरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा पुणे शहराचा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष आहे. मात्र, वेळोवेळी मारहाण शिवीगाळ केल्याच्या वादग्रस्त घटनांमुळे बाबुराव चांदेरे चर्चेत आलेले आहेत.