एक्स्प्लोर
Palghar Accident: पालघर धानिवरी येथे भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांवर काळाचा घाला
Palghar Accident: पालघर जिल्ह्यातील धानिवरी येथे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार-मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला.

Palghar Accident: पालघर धानिवरी येथे भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांवर काळाचा घाला
1/10

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज, 30 नोव्हेंबर रोजी, दुपारी तीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला.
2/10

या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे.
3/10

मालवाहू ट्रक आणि ब्रिझा कार मध्ये धानिवरी येथे हा भीषण अपघात झाला.
4/10

या अपघातात दीपक अग्रवाल , सुमित्रा अग्रवाल, सत्यनारायण अग्रवाल अशा तिघांचा मृत्यू झाला तर केतन अग्रवाल हा जखमी झाला.
5/10

जखमी केतन अग्रवालवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
6/10

समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने ब्रिझा कारने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.
7/10

अपघातानंतर काही वेळातच जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
8/10

मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी तीन जखमींना मृत घोषित केले.
9/10

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आजही टोल वसूल केल्या जाणाऱ्या कंपनीकडून वेळेत रुग्णवाहिका पोहचत नसल्याचं चित्र आहे.
10/10

त्यामुळे टोल वसूल करणाऱ्या कंपनीने फक्त टोल वसूल न करता महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या ठिकाणी तातडीने मदत पोहोचवावी अशी मागणी स्थानिक आणि प्रवाशांकडून केली जात आहे
Published at : 30 Nov 2022 05:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
