एक्स्प्लोर
Srinivas Vanaga: बंडावेळी नाचले, तिकीट कापताच ढसाढसा रडले; शिंदे गटातील श्रीनिवास वनगा आहे तरी कोण?
Palghar Srinivas Vanaga: ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याच्या राजकारणात श्रीनिवास वनगा यांचीच सध्या चर्चा रंगली आहे.

Palghar Srinivas Vanaga
1/8

पालघर विधानसभेचे शिंदे गटाचे विद्यामान आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकीट कापून पालघर विधानसभा मतदारसंघात राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली.
2/8

राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्यानंतर श्रीनिवास वनगा चांगलेच नाराज झाल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयावर श्रीनिवास वनगा यांनी उघडपणे नाराजी देखील व्यक्त केली.
3/8

तिकीट नाकारल्यापासून आतापर्यंत श्रीनिवास वनगा बेपत्ता आहे. त्यामुळे पोलीस आणि कुटुंबियांकडून त्यांचा शोध घेतला जातोय.
4/8

या सर्वप्रकरणानंतर ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याच्या राजकारणात श्रीनिवास वनगा यांचीच सध्या चर्चा रंगली आहे.
5/8

बंड प्रकरणातील पहिल्या सत्रांपासून श्रीनिवास वनगा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिले होते. विशेष म्हणजे खासदार स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या जानेवारी 2018 मध्ये अकस्मात निधन झाल्यानंतर भाजपातर्फे वनगा कुटुंबीयऐवजी पर्यायी उमेदवार देण्याच्या हालचालीला वेग आला होता.
6/8

यावेळी एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास यांना भाजपामधून शिवसेनेत प्रवेश देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र श्रीनिवास वनगा यांचा लोकसभेच्या पोटनवडणुकीत पराभव झाला होता.
7/8

शिवसेनेने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास वनगा यांचे पुनर्वसन करण्यासाठी विद्यमान आमदार अमित घोडा यांच्याऐवजी पालघर विधानसभेची उमेदवारी दिली होती.
8/8

2019 च्या निवडणुकीत श्रीनिवास वनगा 60 हजारपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले होते. नंतरच्या पाच वर्षांच्या कालावधीत श्रीनिवास वनगा हे चांगल्या संपर्कात राहून मतदार संघासाठी चांगला निधीही आणला असल्याचे दिसून आले.
Published at : 29 Oct 2024 10:49 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
