एक्स्प्लोर
Palghar Accident : पालघरमध्ये एसटीचा भीषण अपघात; दोन चिमुकल्यांचा मृत्यू, 10 ते 15 जण जखमी
Palghar ST Bus Accident : मनोर-विक्रमगड रोडवर बोरांडा येथे एसटी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून 10 ते 15 जण जखमी झाले आहेत.

Palghar ST Bus Accident
1/11

पालघरमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे, मनोर-विक्रमगड मार्गावर बोरांडा येथे एसटी बसचा अपघात झाला आहे.
2/11

पालघर-शिर्डी बसला मालवाहून ट्रकने जोरदार धडक दिली, या अपघातामध्ये दोन चिमुकल्यांचा जागीट मृत्यू झाला आहे, तर दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत.
3/11

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना सहाय्य केलं आहे.
4/11

या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिकाच्या मदतीने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
5/11

दरम्यान मोखाडाच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार राजेंद्र गावित यांच्यासमोरच हा अपघात झाला.
6/11

गावित यांनी आपल्या खासगी वाहनातून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.
7/11

पालघरमधील या अपघातामुळे मनोर-विक्रमगड मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
8/11

हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
9/11

अपघातामध्ये बसचं मोठं नुकसान झालं आहे, बसचा अर्धा भाग खाक झाला आहे.
10/11

दरम्यान पोलीस प्रशासनासह खासदारांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली.
11/11

पोलिसांच्या मदतीने वाहतूक कोंडी सोडवण्यात आली.
Published at : 30 Dec 2023 03:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
भारत
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion