एक्स्प्लोर

प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्यापासून बँकेत जाऊन मराठी भाषेचा वापर केला जातो हे पाहावं, असं म्हटलं.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना एक कार्यक्रम दिला. महाराष्ट्र सैनिकांनी उद्यापासून बँकेत जाऊन तुम्ही प्रत्येक बँकेत मराठी भाषा वापरली जाते का ते पाहा असं राज ठाकरे म्हणाले. 

धर्म प्रत्येकानी जोपसला पाहिजे, उंबराठ्याच्या आतून बाहेर आणला तर बुलडोजर आणा.  मी म्हणालो होतो मशीदवरचे लाऊडस्पीकर बंद करा. अजूनही लाऊड स्पीकर मशीद वरचे सुरु आहेत. आता उत्तर प्रदेश मध्ये योगींनी लाऊड स्पीकर बंद केले मात्र आपल्या राज्यत सुरु आहेत,असं राज ठाकरे म्हणाले.

संतोष देशमुख प्रकरण काय मारलं हो..तुम्हाला एवढी मस्ती असेल तर मी तुम्हाला जागा दाखवतो. खंडणीचा विषय होता. आता पर्यत ऐकलं होतो राखेतून फिनिक्स पक्षी येतो. येथे बीड मध्ये राखेतून गुंड तयार होतात? आता खंडणीचा विषय होता याला जातीचा विषय केला आणि वंजाऱ्याने मराठ्याला मारलं असा दाखवलं यात कुठून आला मराठा कुठून आला वंजारी, हा पैशाचा विषय होता तुम्हाला जातीत गुंतवतंय, असं राज ठाकरे म्हणाले. 

आता अजित पवार म्हणाले कर्जमाफी होणार नाही शेतकऱ्यांची ,वाटेल त्या घोषणा तुम्ही निवडणुकीच्या वेळी केल्या आणि तुम्ही भाबडेपणाने मतं दिली कशी? लाडकी बहीण योजनेला द्यायला पैसे आहेत कुठे, असा सवाल देखील त्यांनी केला.  मूळ प्रश्न सगळे बाजूला पडले. तुम्ही जातीपातीचा भेद सोडून एक मराठी म्हणून एक झालं पाहिजे. इतका राजकारणचा झालेला चिखल कधीच पाहायला नाही, इतका भांबावलेला मराठी माणूस आजपर्यंत पाहायला मिळाला नाही. सगळे इंस्टाग्राम वर गुंतून पडलेत, असं राज ठाकरे म्हणाले. 

फडणवीस चांगलं राज्य तुमच्या हातात आहे. मराठी माणसासाठी उभे रहा त्यांच्याकडे बघा.  प्रत्येक गोष्ट फडणवीस आमची ऐकून करा, तुम्हाला आमचा पाठिंबा असेल, असं राज ठाकरे म्हणाले. येथे तुम्ही सांगता मराठी येत नाही, कानफाटातचं बसणार प्रत्येक आस्थापनेमध्ये मराठी राज्य भाषा वापरली गेलीच पाहिजे. तुम्ही उद्या बँकेत जाऊन चेक करा प्रत्येक बँकेत मराठी भाषा वापरली जाते का नाही ते बघा, असं राज ठाकरे म्हणाले.  
 
माझ्या आजोबाने पुस्तक लिहिलं होतं उठ मराठ्या उठ हवं पुस्तक सगळ्यांनी वाचलं पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.  गुढी पाडवा निमित्त तुम्ही एकजुटीने मराठीचा नारा देऊ आणि हिंदुत्व म्हणून समोर जाऊ,असं राज ठाकरे म्हणाले.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले
काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
Embed widget