एक्स्प्लोर

शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा

शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झालं असून शिवसेना ठाकरे गटातील अनेक आमदार-खासदार आमच्या संपर्कात आहेत.

धाराशिव : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन सोहळ्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिवला (Dharashiv) आले असता त्यांनी धाराशिवच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. भविष्यामध्ये तुम्ही बघाल पुढे पुढे काय होतं ते. धाराशिव जिल्ह्यातदेखील काही बदल झाला तर तुम्हाला वेगळं काही वाटायला नको, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच, काही दिवासांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर व ऑपरेशन धनुष्यबाण सुरु असून अनेक आमदार खासदार पक्षात येणार असल्याचेही म्हटले होते. त्याच अनुषंगाने धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) यांनी माध्यमांशी बोलताना सत्ताधारी व शिवसेनेच्या (Shivsena) मंत्र्‍यांना टोला लगावला. धाराशिवच्या बालाघाटमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून वाघाचे वास्तव्य असून तो वाघ अद्यापही वन विभागाला पकडता आला नाही. त्यामुळे, आधी यवतमाळच्या वाघाला पकडा, असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी लगावला. 

शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झालं असून शिवसेना ठाकरे गटातील अनेक आमदार-खासदार आमच्या संपर्कात आहेत. योग्यवेळी ते आमच्या शिवसेना पक्षात प्रवेश करतील असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले होते. मात्र, ठाकरेंच्या खासदाराने ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवली आहे. उदय सामंत उपमुख्यमंत्री होणार आणि शिवसेना फुटणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतरच ऑपरेशन टायगरची बातमी पेरल्याचं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं. शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'ची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी खिल्ली उडवली असून कसलं ऑपरेशन टायगर. इथं यवतमाळहून आलेला वाघ हिंडायलाय तो आधी पकडा, असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी सत्ताधाऱ्यांना व शिवसेनेच्या मंत्र्‍यांना लगावला आहे. यवतमाळहून आलेला वाघ इकडं हिंडायलाय, त्याला आधी पकडा, ते ऑपरेशन टायगर करा. त्याच्यासोबतच दोन बिबटे आलेले आहेत,असा मिश्कील टोला ओमराजे यांनी लगावला आहे.  

संकटकाळात मी पक्षासोबतच

दरम्यान, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यातील आमदार-खसादारांच्या शिवसेना प्रवेशाबाबत भाष्य केलं होतं. त्यावर, उत्तर देताना माझ्याशी कोणीही संपर्क साधला नाही, असे म्हणत धाराशिवमधील आमदार-खासदार फुटीची चर्चा देखील ओमराजे यांनी फेटाळली. संघर्ष आणि संकटाचा काळ आहे, या काळात आम्ही पक्षासोबतच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, धाराशिवचे खासदार आमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे शिवसेना पक्षफुटीनंतरही उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. तर लोकसभा निवडणुकीत ओमराजे राज्यात दुसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत. तर, आमदार कैलास पाटील हेही विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत.

हेही वाचा

पत्नीसोबत प्रवास करणाऱ्या पतीची धावत्या रिक्षातून उडी; उंच पुलावरुन पडल्याने जागीच मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
नवनीता राणा, नवनाथ हे चिल्लर विषय; रामरक्षा आंदोलनावर टीका, अंबादास दानवे भाजप प्रवक्त्यांवर संतापले
नवनीता राणा, नवनाथ हे चिल्लर विषय; रामरक्षा आंदोलनावर टीका, अंबादास दानवे भाजप प्रवक्त्यांवर संतापले
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
Embed widget