'तू लय भारी आहेस, इन्स्टाग्रामवर नवऱ्याने मेसेज केला अन् पहिल्यांदा भेटलो; कोकण हार्टेड गर्लची लव्हस्टोरी
Ankita Walawalkar and Kunal Bhagat Love Story : 'तू लय भारी आहेस, इन्स्टाग्रामवर नवऱ्याने मेसेज केला अन् पहिल्यांदा भेटलो; कोकण हार्टेड गर्लची लव्हस्टोरी

Ankita Walawalkar and Kunal Bhagat Love Story : मराठी बिग बॉसमधून सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या कोकण हार्टेड गर्लने म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकरने नुकतीच लगीनगाठ बांधली. कुणाल भगत याच्याशी तिने लग्न केलंय. दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपूर्वी अंकिताचं लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं होतं. आता अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांनी पाडव्याच्या निमित्ताने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिलीये. यावेळी त्यांनी त्यांची लव्हस्टोरी उलगडून सांगितली आहे.
'तू लय भारी आहेस, मी नॉर्मली मेसेज केला'
कुणाल भगत म्हणाला, इन्टाग्रामवरुन आमच्या बोलण्याला सुरुवात झाली. पहिला मेसेज मीच केला. मी सातत्याने मेसेज करतच होतो. पण तिला दिवसाला खूप मेसेज येत राहतात. माझा मेसेज अंकिताने दोन-तीन महिन्यानंतर पाहिला असेल. छान काम करते, असा मी तिला मेसेज केला होता. मला ती आवडली होती. तिचं मालवणी बोलणं मला आवडलं होतं. तिचे रिल्स मला फार आवडले होते. त्याच्यामुळे मी तिला नॉर्मली मेसेज केला होता की, तू लय भारी आहेस. त्याच्यानंतर आमची भेट अवॉर्ड फंक्शनला झाली. आम्ही तिथे एकमेकांना दिसलो. हाय हॅलो केलं..आम्ही फोटो वगैरे काढला. त्याच्यानंतर खरं बोलणं सुरु झालं.
'त्याने मला अचानक विचारलं तू मला आवडतेस'
अंकिता वालावलकर म्हणाली, त्याने मला एकदा सांगितलं होतं की, आपण एक दिवस भेटूयात, बोलूयात.. मी त्याला नॉर्मल भेटायला गेले होते. त्याने मला अचानक विचारलं तू मला आवडतेस.. मला लग्न करायचं आहे. त्यावेळी मी त्याला नाहीच म्हटलं होतं. त्यानंतर नाही नाही ..असं म्हणत बराच वेळ गेला. तो फार चांगला वक्ता आहे. चांगलं बोलू शकतो. तो खरंच पॉझिटिव्ह आणि प्रेरणादायी बोलत असतो. त्याने माझे लग्न न करण्याचे नकारात्मक पॉईंट्स बाजूला केले.
पुढे बोलताना अंकिता म्हणाली, त्याने कधीच मला आय लव्ह यू म्हटलं नाही. त्यानं मला सांगितलं की, माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे.. मला असं वाटलं की, मराठी भाषेत असं बोलणं यामध्ये किती भावना आहेत, असं मला वाटलं. तो नेहमी मला तसंच बोलतो. त्याच्या तोंडून मी कधी आय लव्ह यू ऐकलं नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या























