कधीकाळी ऐश्वर्या रायसोबत काम अन् आता मुलग्याचा मुलगी झाला; लिंग बदलाची कहाणी ऐकून अंगावर काटा येण्याची वेळ
Saisha Shinde : कधीकाळी ऐश्वर्या रायसोबत काम अन् आता मुलग्याचा मुलगी झाला; लिंग बदलाची कहाणी ऐकून अंगावर काटा येण्याची वेळ

Saisha Shinde : प्रसिद्ध फॅशन डिझायनर ज्याला लोक स्वप्निल शिंदे या नावाने ओळखत असायचे. 40 वर्षे काम करत मोठं नाव मिळवल्यानंतर अचानक त्याने आपली ओळख बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सध्या त्याच्याबाबत सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. ट्रान्सवुमन बनल्यानंतरही त्याने सिनेसृष्टीतील आपल्या कामात कोणती कमतरता ठेवलेली नाही. मात्र, स्वप्नील शिंदे पासून सायशा शिंदे बनण्याचा त्याचा प्रवास अंगावर काटा आणणारा आहे.
सायशा शिंदे हिने सिनेसृष्ट्रीत फॅशन डिझायनर म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जो पहिल्यांदा स्वप्निल शिंदे म्हणून ओळखला जायचा. तो कंगना रनौतच्या ‘लॉकअप स्टार’ या शो मध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. तो पुरुष म्हणून जन्माला आला मात्र, त्याच्या आतमध्ये एक महिला देखील वाढत होती. त्याने नंतरच्या काळात स्वत:मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. सायशाने आज सिनेक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केलीये. तो विदेशातील अनेक व्यासपीठांवर देखील झळकलेला पाहायला मिळालाय.
स्वप्नील शिंदेने एकेकाळी केलं होतं ऐश्वर्यासोबत काम
टिस्का चोप्रासोबतच्या एका यूट्यूब चॅनलला मुलाखतीत सायशा शिंदेने सांगितले की, मी ऐश्वर्या रायसोबत एका फिटिंग सेशनमध्ये काम केले होते. ऐश्वर्याच्या मॅनेजरला सांगितले की, मी आता सायशा बनले आहे आणि सर्वात आधी मला हे ऐश्वर्यालाच सांगायचं होतं. त्यावेळी ही बातमी मीडियापर्यंत पोहोचली नव्हती. हे सर्व फक्त माझ्या जवळच्या मित्रांनाच माहित होते. त्यावेळी माझी ऐश्वर्यासोबत मीटिंग होती. म्हणून मी तिच्या मॅनेजरला सांगितले कि तयार हो, स्वप्नील नाही तर सायशा येईल. मला कोणाला चकित करायचे नव्हते, म्हणून मी त्यांना आधीच सांगितले. त्यावेळी ऐश्वर्या रायने तिची मुलगी आराध्याचीही माझ्याशी तशीच ओळख करून दिली होती.
मुलगा म्हणून आयुष्य घालवल्यानंतर साईशाला मुलगी बनणे सोपे नव्हते. त्यांचा हा प्रवास खूप वेदनादायी होता, 20 वर्षांपासून त्यांनी ही ओळख दाखवून दिली आहे. त्यानंतर वयाच्या 40 व्या वर्षी तिने ट्रान्सवुमन बनण्याचा निर्णय घेतला. त्याच्यातील बदल पाहिल्यानंतर त्याने सोशल मीडियावर मुलाकडून मुलगी झाल्याची माहिती दिली. तिच्या कुटुंबियांनीही हे मान्य केले होते. खूप प्रदीर्घ शस्त्रक्रियेनंतर तो स्वप्नील पासून सायशा झाला होता.
नुकतीच सायशाने लिंग बदल शस्त्रक्रियेबाबत सर्वांना माहिती दिली आहे. एका शस्त्रक्रियेद्वारे तिचे आता पूर्णपणे स्त्रीच्या शरीरात रूपांतर झाले आहे. या काळात सायशाला मोठ्या वेदनांना सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षी सायशा कंगना राणौतच्या लॉकअप या शोमध्ये दिसली होती. शो मधला त्याचा प्रवासाने सर्वांची मने जिंकली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या


















