Ravi Rana : उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
Ravi Rana on Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे नेतृत्व उद्धव ठाकरे येणाऱ्या काळात स्वीकारतील, असा खळबळजनक दावा रवी राणा यांनी केलाय.
Ravi Rana : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटात उदय होणार आहे. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेना तोडण्यात आली. त्याप्रमाणे अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पक्ष तोडला जाईल. भारतीय जनता पक्षाला देशभरात पक्ष तोडण्याची चटक लागली आहे. फक्त इथे नाही, चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचा पक्ष देखील तोडला जाईल, असे वक्तव्य केले. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय आणि युवा स्वाभीमान पक्षाचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करत खळबळजनक दावा केलाय.
रवी राणा म्हणाले की, संजय राऊत यांना कल्पना नाही. ते आधी सुद्धा अंधारात होते आणि आता सुद्धा ते अंधारात आहेत. उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात छुपी रणनीती सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे नेतृत्व उद्धव ठाकरे येणाऱ्या काळात स्वीकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील नेतृत्व उद्धव ठाकरे येणाऱ्या काळात स्वीकारणार आहेत. त्या गतीविधीने उद्धव ठाकरेंचे पाऊल टाकणे सुरू आहे, असा दावा त्यांनी केलाय. तसेच उद्धव ठाकरे हे भाजपसोबत दिसतील, त्यावेळी संजय राऊतांना मोठा झटका बसणार आहे, असेही रवी राणा यांनी म्हटले आहे.
तेव्हा शिंदेंना मुख्यमंत्री केलं अन् फडणवीस स्वतः उपमुख्यमंत्री झाले
एकनाथ शिंदे यांना पाळावा लागला. एकनाथ शिंदे यांच्याकडे पर्याय नव्हता. आपली कातडी वाचवण्यासाठी, आपल्यावरील खटले थांबवण्यासाठी त्यांना सरकारमध्ये जावे लागले, असेही संजय राऊत यांनी म्हटले होते. याबाबत विचारले असता रवी राणा म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे लोकप्रिय मुख्यमंत्री होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद घेतले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चांगला नेता दोन पाऊल मागे येऊन मुख्यमंत्रीपद सोडून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारू शकतो तर आता बहुमत भाजपचे आहे. आता सत्ता भाजपची आहे, असे त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या