एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
ST Fare Hike : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एसटी भाडेवाढीच्या निषेधार्थ उबाठा गटाकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात मध्यवर्ती बस स्थानक परिसरात चक्का जाम आंदोलन केले जात आहे.
Chhatrapati Sambhajinagar: एसटी महामंडळाने तिकिटाचे दर वाढवल्याने नागरिकांना मोठी झळ बसणार आहे .भाडेवाडी रद्द करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एसटी भाडेवाडीच्या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झालाय . विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात मध्यवर्ती बस स्थानक परिसरात चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले असून नांदेड शहरातही एसटी भाडेवाडीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे . एकीकडे लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जातात .तर दुसरीकडे एसटी बसची भाडे वाढ करून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. (ST Fare Hike Protest )
23 जानेवारीला दुपारच्या सुमारास परिवहन प्राधिकरणाची बैठक पार पडली असून या बैठकीत एसटी भाडेवाढीचा निर्णय झाला आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली एसटी दरवाढीबाबत 14.95 टक्के इतकी वाढ झाली आहे. तर रिक्षा आणि टॅक्सी यांची दरवाढ ही एक फेब्रुवारीपासून लागू होणार असून ती 3 रुपयांनी वाढवली आहे.
छत्रपती संभाजीनगरसह नांदेडमध्ये ठाकरे गट आक्रमक
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एसटी भाडेवाढीच्या निषेधार्थ उबाठा गटाकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात मध्यवर्ती बस स्थानक परिसरात चक्का जाम आंदोलन केले जात आहे. दरम्यान, एसटी भाडेवाडीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी नांदेड शहरातील मध्यवर्ती बास्थानाकासमोर चक्काजाम आंदोलन केले.एकीकडे लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जातात.तर दुसरीकडे एसटी बसेसचे भाडेवाढ करून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम हे सरकार करत आहे असा आरोप या शिवसैनिकांनी केले आहे.नांदेड जिल्ह्यातील एकूण नऊ ही अगरा समोर हे आंदोलन करण्यात येत आहे.अचानक सुरू केलेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर बसेसच्या रांगा लागल्या होत्या. त्याच बरोबर प्रवाशांचा देखील खोळंबा झाल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान एसटी ची भाडेवाढ रद्द करावे अन्यथा या पुढं देखील दर वाढी विवरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिला आहे.
अंबादास दानवेंचा राज्यभर आंदोलनाचा इशारा
दोन महिन्यांपूर्वी एसटीच्या अध्यक्षांनी एसटी फायद्यात असल्याचं वक्तव्य केलं होतं. आता भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एसटीची ही भाडेवाढ अतिशय अन्यायकारक आहे. एसटी प्रवाशांच्या व्यथा तुम्हाला काय माहित. एसटीही शहरी आणि ग्रामीण भागात प्रवासाचं मुख्य साधन आहे. त्यातच जर १५ टक्के वाढ होत असेल तर त्याला विरोध करण्याची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. मराठवाड्यातील तालुक्यातालुक्यात शिवसैनिक चक्काजाम आंदोलन करत आहेत. जर भाडेवाढ रद्द झाली नाही तर बसस्थानकाच्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर बसू, चक्काजाम करू असे अंबादास दानवे म्हणाले. आज केवळ मराठवाड्यात हे आंदोलन आहे. उद्या राज्यातही हे आंदोलन करण्याचा इशारा अंबादास दानवेंनी दिलाय.
हेही वाचा: