एकेकाळी युरोपच्या गल्ल्यांमध्ये रोमँटिक फोटोशूट, प्राजक्ता माळीसोबतचा 'तो' तरुण कोण?
Actress Prajakta Mali and Alok Bhadane : एकेकाळी युरोपच्या गल्ल्यांमध्ये रोमँटिक फोटोशूट, प्राजक्ता माळीसोबतचा तो तरुण सध्या काय करतो?

Actress Prajakta Mali and Alok Bhadane : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर तुफान चर्चेत असते. 28 फेब्रुवारी रोजी तिच्या Chiki Chiki Booboom Boom या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आल होता. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी, आणि अभिनेत्री नेहा पेंडसे हे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमी चर्चेत असते. ती कोणासोबत लग्न करणार? याबाबत देखील सोशल मीडियावर चर्चा रंगलेली पाहायला मिळते. प्राजक्ताने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात तिचा क्रश कोण आहे? याबाबत भाष्य केलं होतं. प्राजक्ताने तिच्या स्वप्नातील हिरोचे गुण सांगितले होते. ती म्हणाली होती की, तो चहा पिणारा असेल. मला चहा फार छान बनवता येतो आणि प्यायला देखील आवडतो. त्याला दाढी असेल. मराठी माणसाला दाढी मिशा हव्यात. तो मला डोंगरावर फिरायला घेऊन जाणारा असेल.. माझ्या कविता ऐकणारा असेल..
दरम्यान, सध्या प्राजक्ता माळीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हे युरोपमधील गल्ल्यांमधले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ताने एका तरुणासोबत रोमँटिक फोटोशूट केलंय. हे फोटो प्राजक्ताने 2019 मध्ये सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो शेअर करताना प्राजक्ताने कॅप्शन दिले होते की,"युरोप च्या गल्यांमध्ये रोमॅंटीक फोटोज नाही काढले तर मग काय फायदा.. " शिवाय प्राजक्ताने अलोक भदाणे या तरुणाचे आभार देखील मानले होते. माझा फोटो पार्टनर झाल्याबद्दल आणि युरोप ट्रीपमध्ये माझे चांगले फोटो काढल्याबद्दल धन्यवाद..., असंही यावेळी प्राजक्ताने म्हटलं होतं.
प्राजक्तासोबत रामँटिक फोटोशूट करणारा तरुण कोण आहे?
प्राजक्तासोबत रोमँटिक फोटोशूट करणाऱ्या तरुणाचं नाव अलोक भदाणे असं आहे. दरम्यान, प्राजक्ताने फोटो शेअर केल्यानंतर दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. टाईम्स ऑफ इंडियाने दोघांच्या डेटींग चर्चाबाबत एक बातमी देखील प्रसिद्ध केली होती. दरम्यान, या फोटोंबाबत अभिनेत्रीने काही असं देखील लिहिलं होतं की, तू फार चांगलं काम केलंस भावा...“Chhatrapal” तुझं हे नाव देखील फार कूल आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अलोक भदाणे हा एका ट्रॅव्हलिंग कंपनीचा मालक आहे. देश-विदेशात त्याच्या ट्रॅव्हलिंग कंपन्या काम करतात. त्याला सायकलिंगची देखील आवड आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























