Raj Thackeray: मुंबईतील 4 नद्या 'वारल्या' नव्हे मारल्या, नद्यांवर बोलल्यावर धर्म आडवा येणार? राज ठाकरेंचा संतप्त सवाल
धर्माच्या गोष्टी मला कोणीही सांगू नयेत. काही गोष्टी आपण आपल्या सुधारल्या पाहिजेत.असेही राज ठाकरे म्हणाले.. हा विषय बोलून झाल्यावर मी नांदेडच्या गुरुद्वारात होतो.....

Raj Tahckeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कवर पार पडत आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील नद्यांवरून सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. कुंभमेळ्यातील गंगेच्या स्थितीपासून राज्यातील 55 नदीपट्टे प्रदूषित असल्याचं सांगत मुंबईत 4 नद्या 'वारल्या' नव्हे मारल्या. एक मिठी नदी मरणासन्न अवस्थेत आहे. असं म्हणत राज ठाकरेंनी नद्यांवर बोललो की धर्म आडवा येणार ? असा संतप्त सवाल केला.
काय म्हणाले राज ठाकरे? Raj Thackeray Speech
महाराष्ट्रातली कोकणातली सावित्री नदी घ्या. केमिकलने भरली आहे. देशभरात एकूण 311 नदीपट्टे असे आहेत जे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून प्रदूषित महाराष्ट्रातील तब्बल 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत. यातील सर्वात प्रदूषित नद्या उल्हास नदी मिठी नदी मुळा मुठा सावित्री भीमा पवना तापी कान्हा तापी गिरणा पुंडलिका दारणा इंद्रायणी निरा वईनगंगा चंद्रभागा मुचकुंडा गोड कीतुर कृष्णा वर्धा पाताळगंगा, सूर्या वाघुळोरडोरणा यांना द्या यांना द्यान मधलं पाणी अत्यंत वाईट आहे. मुंबईमध्ये पाच नद्या होत्या. अनेकांना आता त्या माहीतही नसतील. त्यातल्या चार मेल्या. मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी झोपडपट्ट्या मूळ या चार नद्या मेल्या. पाचवी आता मरायला आली आहे ती नदी म्हणजे मिठी नदी. मुंबईमधील पाचवी मिठी नदी तिची दुरावस्था व्हिडिओ मधून राज ठाकरेंनी दाखवली.
दरवर्षी येणार मुंबई महापालिका म्हणणार. आम्ही मिठी नदी साफ केली. जोपर्यंत आजूबाजूची वस्ती हटत नाही तोपर्यंत या नद्या कधीही साफ होणार नाहीत. आपल्या सगळ्या नद्यांमध्ये केमिकल्स भरले आहेत. आमचं प्रदूषण नियंत्रण बोर्ड काय करतं? उद्योगधंद्यांना प्रोत्साहन कारण उद्योगपती यांना प्रोत्साहन देतात. जे जे म्हणून आपले नैसर्गिक स्त्रोत आहेत ते सगळे बंद करायचे. आणि नद्यांच्या प्रदूषणावर बोललं तर तुमचं धर्म आडवा येणार असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला.
धर्माच्या गोष्टी मला कोणीही सांगू नयेत. काही गोष्टी आपण आपल्या सुधारल्या पाहिजेत. हा विषय बोलून झाल्यावर मी नांदेडच्या गुरुद्वारात होतो. त्यांनी मला सांगितलं की इथले गुरुजी मला म्हणाले तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. मी म्हणालो होतो जिल्हा परिषद ग्रामपंचायत देशभर सगळ्या ठिकाणी आमच्याकडे भिंती रंगवल्या जातात बोर्ड रंगवले जातात झाडं जगवा झाड वाचवा . आणि दुसरीकडे आपल्या हिंदूंचे अंतिम संस्कार हे लाकडावरती होतात. लाकूड कुठून येतं? या देशात जंगलतोड झाल्याशिवाय लाकूड येणारच नाही. याला पर्याय म्हणून विद्युत दाहीने आल्या. काहीजण असतात कर्मठ. विद्युत दाहिनी नको म्हणणारे. विद्युत दाहिनी केल्यावर काय कल्याणला उतरवतात का? देशभर विद्युत दाहिण्या झाल्या पाहिजेत तर लाकूड जळणार नाही जंगलतोड थांबेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे जंगलात गेले होते. फिरायला. म्हणजे पंतप्रधानांना जंगलाची आवड आहे. परवा अंबानीच्या वनतारा फणतारा मध्ये गेले होते. म्हणजे प्राण्यांचीही त्यांना आवड आहे. असा असेल तर जंगला जगवली पाहिजेत. मुंबईचा नॅशनल पार्क पवई पासून सुरू होतं घोडबंदरला थांबतं. एवढा मोठा नॅशनल पार्क एखाद्या शहरात असेल जे जगाच्या पाठीवर कुठेही नाही. आपण आपले मूळ विषय विसरले आहोत असेही राज ठाकरे म्हणाले























