Raj Thackeray : चित्रपटानं जागे होणारे हिंदू काय कामाचे नाहीत, चित्रपट थिएटरमधून उतरला की हे उतरले : राज ठाकरे
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमासह औरंगजेबाच्या कबरीवर भाष्य केलं.

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मराठवाड्यात, देशातील अनेक जिल्ह्यात काही दिवस पाणी येत नाही, मूळ विषयांकडे लक्ष नाही. आम्हाला कशाची पडली नाही, आम्हाला पडलेय औरंगजेबाची, तो बसलाय एकटा द्राक्षं खातं आणि आम्ही भांडतोय. औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे की उडवली पाहिजे. चित्रपटानं जागे होणारे हिंदू काय कामाचे नाहीत, चित्रपट थिएटरमधून उतरला की हे उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आता विकी कौशल मेल्यावर कळलं? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला. व्हाटसअपवर इतिहास वाचता येत नाही. इतिहास वाचण्यासाठी पुस्तकात डोकं घालावं लागेल. आता कुणीपण बोलायला लागलेत विधानसभेत बोलत आहेत, खरंतर काही काम नाही, औरंगजेबावर बोलतात. माहिती आहे तरी का औरंगजेब काय प्रकरण होतं, असं राज ठाकरे म्हणाले.
हे बाहेरुन आलेले सर्व लोकं, औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दाहोदमधील जन्म, मग काय सोपं आहे. जातीपातीत भिडवून द्यायला. यांना ब्राह्मणांनी साथ दिली. त्यांना मराठ्यांनी साथ दिली, तिकडे मराठे नव्हतेच, हे सगळं चोरुन ब्राह्मणांनी केलं. हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाही. यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. यांना ना संभाजी महाराजांशी कर्तव्य आहे, ना औरंगजेबाशी कर्तव्य आहे, यांना फक्त माथी भडकावयची आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.
इतिहासाच्या पानात खोलवर गेलात ना अपेक्षांची, भावनांची भांडी फुटतील. हिंद प्रांतात अत्यंत कडवट, प्रभावी स्वप्न ज्यांना पडलं त्या राजमाता जिजाऊ साहेब, हे त्यांचं स्वप्न, त्यांचे वडील असल्यापासून त्या बघत होत्या. आमची लोकं या लोकांकडे का चाकरी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हा हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे. तो एक चमत्कार आहे, ती एक विलक्षण घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे. तो विचार जन्माला यायच्या अगोदर हिंद प्रांताची काय अवस्था होती. तो देश नव्हताच, सर्व जातीचे लोक कोणा ना कोणाकडे कामाला होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आदिलशाहीकडे होते. त्यानंतर ते निजामशाहीत गेले. शिवाजी महाराजांचा लढा महाराष्ट्रातील सरंजामदारांशी होता, असं राज ठाकरे म्हणाले.
अफजलखानाचा वकील हा कुलकर्णी नावाचा होता, तो ब्राह्मण होता, अफजलखानाशी बोलणी करायला गेलेला शिवाजी महाराजांचा वकील ब्राह्मण होता. त्यावेळी सगळी लोकं इकडे तिकडे कामाला होती. इतिहासातील प्रत्येक गोष्ट कागदावर लिहलेली नाही. 300 ते 400 वर्षांपूर्वीचा इतिहास त्यावर आम्ही भाडंतोय. आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर संभाजी महाराजांनी औरंगजेबाची 5 हजारांची मनसबदारी स्वीकारली होती. परिस्थितीनुसार काही निर्णय घ्यावे लागतात, कशा अंगानं इतिहास पाहायचा असतो ते आपण बघणार आहोत की नाही, असा सवाल राज ठाकरे म्हणाले. औरंगजेबाचा माणूस मिर्झाराजे जयसिंग आला होता, तो राजपूत होता. तानाजी मालुसरेंचा मृत्यू झाला तो उदयभान राठोडाविरुद्ध लढताना, तो राजपूत होता. कोणत्या काळात जगतोय आपण असं राज ठाकरे म्हणाले.
औरंगजेब बादशाहचं राज्य अफगाणिस्तान ते दक्षिणेपर्यंत आणि तिथून बंगाल पर्यंत होतं. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून निघाले. त्यानंतर 1674 ला राज्याभिषेक झाला, 1680 ला मृत्यू झाला. त्या दरम्यान औरंगजेबाचा एक मुलगा दक्षिणेत आला त्याला छत्रपती संभाजीराजेंनी बरोबर घेतलं, असं राज ठाकरे म्हणाले. औरंगजेब 1681 ते 1707 या 27 वर्ष तो लढत होता. संभाजीराजांना क्रूर पद्धतीनं मारलं, राजाराम महाराज लढले, संताजी धनाजी लढले, महाराणी ताराराणी लढल्या. नरहर कुरुंदकर म्हणाले मराठे सर्व लढत हरत होते पण औरंगजेब एकही लढाई जिंकत नव्हता. औरंगजेबाला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता, त्याला जमलं नाही, सर्व प्रयत्न करुन इथं मेला. जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो, त्याचा अभ्यास केला जातो. त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळी जगातील लोकांना कळतं तो काय करायला गेला आणि कसा मेला. कबर आहे ना ती सजावट काढून तिथं बोर्ड लावा आम्हा मराठ्यांना मारायला आलेला औरंगजेब इथं गाडला. अफजलखान इथं आला त्यावेळी प्रतापगडावर मारला तिथं त्याची कबर खोदली गेली, असं राज ठाकरे म्हणाले.
इतर बातम्या:
























