एक्स्प्लोर
Aarey Metro Car Shed : आरेत मेट्रो कारशेडचे बांधकाम सुरू?; पाहा फोटो
Aarey Metro Car Shed : मुंबईतील आरेमधील मेट्रो कारशेडचे काम सुरू करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे चित्र आहे.

Aarey Metro Car Shed : आरेत मेट्रो कारशेडचे बांधकाम सुरू?; पाहा फोटो
1/7

आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडचे (Aarey Metro Carshed) काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच कारशेड परिसरातील झाडे तोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्याविरोधात मुंबईकरांनी, पर्यावरणप्रेमींनी आरे कॉलनीत जोरदार निदर्शने केली होती.
2/7

मागील आठवड्यात झाडांची छाटणी करण्यासाठी आरेतील मुख्य रस्ता बंद करण्यात आला होता. त्याच दरम्यान, आरेतील मेट्रो कारशेडच्या ठिकाणी असलेली झाडे तोडण्यात येत असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केला होता.
3/7

आरेतील मेट्रो कारशेडच्या प्रस्तावित ठिकाणावरील काही फोटो समोर आले आहेत. या ठिकाणी कारशेडच्या कामाला वेग देण्यासाठीच्या हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे.
4/7

या ठिकाणी मेट्रो कारशेडच्या ठिकाणी 'मेट्रो-3' चे कोच उभे करण्यासाठी हे काम केले जात असल्याची चर्चा आहे.
5/7

आरेत कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीरपणे झाडे तोडण्यात आली नसल्याचा दावा मुंबई मेट्रोकडून करण्यात आला आहे.
6/7

तर, पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीविरोधात कोर्टात धाव घेतली आहे.
7/7

मुंबई मेट्रोचे कारशेड हे आरेमध्ये न करता कांजूर अथवा इतर ठिकाणी करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. मेट्रो कारशेडच्या ठिकाणी बिबट्यांचा अधिवास असल्याचेही त्यांनी सांगितले.
Published at : 02 Aug 2022 06:57 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion