एक्स्प्लोर
PHOTO: पालखी निघाली राजाची, गणेश नगरात गर्दी भाविकांची; 'लालबागचा राजा' थाटात विसर्जनासाठी मार्गस्थ
Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 : नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला आहे.

Lalbaugchya Raja Visarjan Miravnuk 2024
1/10

मयूर सिंहासनावर रूढ लालबाग राजाची स्वारी ऐटीत विसर्जनासाठी मार्गस्थ झाली आहे.
2/10

तर, आपल्या लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी लालबागमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
3/10

राजाची स्वारी लालबाग मार्केटच्या वेशीवर येताच मानाची फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
4/10

लालबागचा राजा आता लालबाग नगरीला प्रदक्षिणा घालून भक्तांचा निरोप घेणार आहे.
5/10

त्यानंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे.
6/10

गुलालाची उधळण करत लालबाग राजाची मिरवणूक जल्लोषात मार्गस्थ झाली आहे.
7/10

मोठ्या संख्येनं भाविक लाडक्या लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले असून ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला आहे.
8/10

गुलालाची उधळण करत, ढोल-ताशांच्या गजरात भाविक आपल्या लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.
9/10

संपूर्ण लालबागमध्ये अनेक पुष्पवृष्टी लालबागच्या राजावर फुलांचा वर्षाव करण्यासाठी सज्ज आहेत.
10/10

अकरा दिवस पाहुणचार घेणाऱ्या लाडक्या लालबागच्या राजाला कार्यकर्ते साश्रू नयनांनी निरोप देत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Published at : 17 Sep 2024 01:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
