एक्स्प्लोर
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Saif ali khan चोरट्याकडून स्वत:च्याच घरात हल्ला झाल्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेणारा बॉलिवूडचा नवाब अखेर आज घरी परतला.

saif ali khan first photo after discharge from hospital
1/8

चोरट्याकडून स्वत:च्याच घरात हल्ला झाल्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेणारा बॉलिवूडचा नवाब अखेर आज घरी परतला.
2/8

लीलावती रुग्णालयातून सैफ अली खानला आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर, आपल्या काळ्या रंगाच्या कारमधून पांढरे कपडे घातलेला सैफ नवाबी रुबाबात बाहेर पडला.
3/8

कारमधून बाहेर येताच सैफ अली खानने आपल्या चाहत्यांना हात दाखवून अभिवादन केले. अंगावर पांढरा शर्ट अन् निळी जिन्स घालून सैफ घरी परतला.
4/8

सैफ अली खानच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त आजूबाजूला दिसून आला. यावेळी, हसकीसी स्माईल आणि डोळ्यावर गॉगल असलेल्या सैफने थंब दाखवत आपण ठीक असल्याचे सूचवले.
5/8

दरम्यान, सैफ अली खानचे रुग्णालयातून बाहेर आल्यानंतरचे फोटो समोर आले असून त्याच्या खांद्यावर बँडेज पट्टी लावल्याचे दिसून येते.
6/8

16 जानेवारी रोजी वांद्रे येथील सैफ अली खानच्या घरी चोरट्याने मध्यरात्री चोरीची प्रयत्न केला. यावेळी, अभिनेता सैफ अली खानसोबत त्याची झटापट झाली. त्यामध्ये, चोरट्याने सैफवर चाकूने वार केला होता.
7/8

चोरट्याकडून झालेल्या हल्ल्यानंतर सैफ अली खानला रात्रीच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली.
8/8

रुग्णालयातील शस्त्रक्रिया व उपचारानंतर आज सैफ अली खान त्याच्या घरी परतला असून बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याच्या प्रकृतीची विचारपूस केलीय
Published at : 21 Jan 2025 05:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
