मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात सुदर्शन घुलेविषयी महत्त्वाचे पुरावे सापडले, SIT चा बीड न्यायालयाकडे महत्त्वाचा अर्ज
संतोष देशमुख हत्याकांडात आणि खंडणी प्रकरणांमध्ये सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे.
Santosh Deshmukh Case Update: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाची चक्र वेगाने फिरत असून या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले विषयी काही महत्त्वाचे पुरावे एसआयटीला सापडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सुदर्शन घुलेची पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी SIT ने बीडच्या न्यायालयात अर्ज केलाय. संतोष देशमुख हत्याकांडात आणि खंडणी प्रकरणांमध्ये सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे. त्यानंतर सुदर्शन गुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही मिळाली होती. आता SIT ला पोलीस कोठडी मिळावी असा अर्ज मकोका कोर्ट विशेष न्यायाधीश सुरेखा आर पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे घटनास्थळावरून दुपारी 3 ते 3.15 च्या दरम्यान अपहरण झाले. यावेळी वाल्मीक कराडशी सहआरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या दोघांचे दूरध्वनी वरून संभाषण झाले. त्यानंतर मस्साजोग मांजरसुंबावरील डोनगाव फाटा टोल नाक्याजवळ संतोष देशमुख यांचा खून झाल्याचे आढळून आले. त्यानंतर 29 नोव्हेंबर 2024 मधील कथित सीसीटीव्ही फुटेज तपासले गेल्यानंतर वाल्मीक कराडसह विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि सरपंच अपहरण आणि खून प्रकरणाचा संबंध असल्याचे SIT ला दिसून आले होते. आता सुदर्शन घुलेबाबत एस आय टी ला नवे पुरावे सापडले असून बीड न्यायालयाकडे SIT ने सुदर्शन गुलेची पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी अर्ज केला आहे .(Beed)
नक्की काय म्हटलंय अर्जात ?
संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेची पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी एसआयटीकडून बीड न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आलाय . आरोपी सुदर्शन घुले संदर्भात काही पुरावे सापडल्यामुळे एसआयटी ला सुदर्शन घुलेची पोलीस कस्टडी हवी आहे .या संदर्भातला अर्ज मकोका कोर्ट विशेष न्यायाधीश सुरेखा आर पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे .मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्याकांडामध्ये आणि खंडणी प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी आहे .त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाईही झाली आहे . सुदर्शन गुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली होती .यावेळी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी पोलीस कोठडीचा अधिकार अबाधित ठेवावा असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते .गरज पडल्यास आरोपी सुदर्शन घुलेसह इतर आरोपींना पोलीस कोठडी मागण्याचा अधिकार अबाधित ठेवावा असेही यात म्हटले होते .दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि मकोका अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील बीड जिल्हा न्यायालय मध्ये हजर आहेत .सरकारी पक्षाकडून वकील बाळासाहेब कोल्हेही हजर राहतील .आरोपीचे वकील तिडकेही बीड जिल्हा न्यायालयात हजर राहणार आहेत
हेही वाचा: