Amravati News : भर रस्त्यात वीजेचा खांब, खांबावर खाट टाकला, ऐटीत बसून आंदोलन, मागणी नेमकी काय?
Amravati News : अमरावतीत एका अनोख्या उपोषणाची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे. हे उपोषण ज्या मागणीसाठी होतंय ती मागणीही तितकीच रंजक आहे.
Amravati News : अमरावतीत एका अनोख्या उपोषणाची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे. हे उपोषण ज्या मागणीसाठी होतंय ती मागणीही तितकीच रंजक आहे. कारण इलेक्ट्रिकचा खांब रस्त्याच्या मधोमध असल्याने तो बाजूला घेण्याची तसदी ही न घेता संबंधित विभागाने तो रस्ता तसाच तयार केलाय. परिणामी इलेक्ट्रिकचा खांब धोकादायक असल्याने तो बाजूला करणात यावा या मागणीसाठी विलास चर्जन (Vilas Charjan) यांनी चक्क इलेक्ट्रिक पोलवर खाट बांधून जीव धोक्यात घालत आज (27 जानेवारीला) सकाळी उपोषण सुरू केले आहे. या अनोख्या उपोषणाची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे.
चक्क वीजेचा खांबावर खाट टाकत आंदोलन नेमकं प्रकरण काय?
पुढे आलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील सोनेरी येथील हे उपोषण आहे. दरम्यान, वारंवार इलेक्ट्रिक पोल काढण्यासंदर्भात तक्रारी करून देखील पोल हटवण्यात न आल्याने चर्जन यांनी या अनोख्या आणि जीव धोक्यात टाकून उपोषणाला सुरुवात केलीये. विशेष म्हणजे इलेक्ट्रिकच्या पोलवर चक्क खाट बांधून त्यावर जीव धोक्यात घालत सर्जन यांनी उपोषण सुरू केल्याने ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आहे. परिणामी या अनोख्या उपोषणाची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे. या उपोषणामुळे प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय.
मात्र वारंवार इलेक्ट्रिक पोल काढण्यासंदर्भात तक्रारी करून देखील संबंधित प्रशासनाने हा पोल हटवण्यात न आल्याने आज चर्जन यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी या अनोख्या उपोषणाला सुरुवात केल्याचं सांगितलंय. दरम्यान आता तरी त्यांची मागणी मान्य होतेय का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे या इलेक्ट्रिक पोलवरील आंदोलनामुळे काही दुर्घटना होण्याची ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर
सनफ्लॅग कंपनीत काम करत असताना क्रेनचा हूक अंगावर पडल्यानं दोन कामगार गंभीर जखमी झालेत. ही घटना आज (27 जानेवारी) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही गंभीर कामगारांवर भंडाऱ्यातील लक्ष हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. जखमी कामगारांमध्ये एक लाडका भाऊ योजनेअंतर्गत कामगार असून दुसरा कंत्राटी कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्या दोघांचीही नावं कळू शकली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
- Chhatrapati Sambhajinagar : 24 तासांमध्ये मस्ती उतरवत गुडघ्यावर टेकवला; प्रसिद्ध बिल्डर कुणाल बाकलीवालची श्रीमंतीची नशा पोलिसांनी उतरवली
- Chandrapur News: 19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं