एक्स्प्लोर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरली. त्यामुळे, मीडियापासून व कामातून दूर दिसलेले धनजंय मुंडे आता सक्रीय झाल्याचं पाहायला मिळालं.
Dhananjay munde active in mantralaya
1/7

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे, मीडियापासून व कामातून दूर दिसलेले धनजंय मुंडे आता कामात सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे.
2/7

धनंजय मुंडेंनी माजी मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट व आशीर्वाद घेतले. तसेच, भुजबळ यांनी अनेक वर्षे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री म्हणून काम केलेले असल्याने या खात्यातील कामकाजासंबंधी त्यांनी मार्गदर्शनही केल्याचे मुंडे यांनी म्हटलं आहे.
3/7

अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रालयात विभागाच्या सचिव जयश्री भोज, शिधावाटप मुंबई विभागाचे मुख्य नियंत्रक सुधाकर तेलंग व अन्य अधिकाऱ्यां सोबत कामकाज अधिक प्रभावीपणे करण्याबाबत चर्चा केली.
4/7

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचवलेल्या शंभर दिवसाचा कार्यक्रम 100% यशस्वी करण्याच्या दृष्टीने सूचना केल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली.
5/7

मंत्रालयात भेटीसाठी आलेल्या नागरिकांशी चर्चा करून त्यांची कामे समजावून घेत त्यांचा निपटारा करण्यासाठी संबंधितांना सूचना केल्याचेही मुंडेंनी म्हटले आहे.
6/7

दरम्यान, सोशल मीडियातूनही गेली काही दिवस दूर असलेले धनंजय मुंडे आज सोशल मिडिया अकाऊंटवर एक्टीव्ह दिसून आले. त्यांनी मंत्रालयातील भेटीगाठीचे फोटोही शेअर केले आहेत.
7/7

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे कामात अॅक्टीव्ह झाले असून राजीनाम्याच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे.
Published at : 10 Jan 2025 07:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























