एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil: पंकजा मुंडेंनी दाखवली अंतरवाली सराटीत येण्याची तयारी, जरांगे म्हणाले, 'आम्ही खुनशी अथवा जातीयवादी नाही'

Manoj Jarange Patil: अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद. मी सामूहिक उपोषणाला बसलेल्या तरुणांना उपोषण सोडायला सांगणार आहे

जालना: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांना आरक्षण देणार आहेत की नाही, हे सगळ्यांना कळणे गरजेचे आहे. आमचा सरकारसोबत कोणताही संपर्क झालेला नाही, किंबहुना आम्हाला त्याची  गरज नाही. आपला शत्रू कोण आहे? गरीब मराठ्यांच्या पोरांचा मारेकरी कोण आहे, हे कळणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सामूहिक उपोषण करणाऱ्या लेकरांचा जीव जाऊ न देणं ही मुख्यंत्र्यांची जबाबदारी आहे. फक्त मराठ्यांना हाल हाल करुन मारणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केले. ते सोमवारी अंतरवाली सराटीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार  परिषदेत बोलत होते. 

मी सामूहिक उपोषणाला बसलेल्या तरुणांना उपोषण सोडायला सांगणार आहे. मराठा तरुणांची शरीर उपोषणामुळे खराब व्हायला नको. माझ्या शरीराचं वाटोळं झालेलं आहे, पण तरुणांचं शरीर खराब होता कामा नये. त्यामुळे आज मी सामूहिक उपोषणाला बसलेल्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणार आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. मराठ्यांच्या ठरलेल्या मागण्या आहेत, त्या द्या एवढंच मला म्हणायचं आहे बाकी काही नाही, असेही मनोज जरांगे यांनी सांगितले.

पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर जरांगे पाटील काय म्हणाले?

मनोज जरांगे यांनी परवानगी दिली तर मी अंतरवाली सराटीला येऊन मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करेन, अशा आशयाचे वक्तव्य राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते. याविषयी मनोज जरांगे यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, आम्ही काय दहशतवादी आहोत का? आमची कोणाला ना नाही, अंतरवाली सराटीत कोणीही येऊ शकते आणि जाऊ शकते. आम्ही खुनशी नाही, जातीयवादी नाही. आम्ही कोणावरही डुख धरत नाही. इथे कोणीही येऊ शकतो कोणीही जाऊ शकतो इथं कोणाला ना नसते सगळा देश येऊन गेला आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

समाजाच्या लोकांचे कल्याण व्हावं हेच आमचे म्हणणे आहे. मध्यस्थ अशोकराव चव्हाण यांनी करावी किंवा आणि कोणी करावी याबाबत आमची ना नाही, आमच्या लेकरांचे कल्याण व्हावं आमच्या लेकरांना न्याय मिळावा एवढाच आमचा उद्देश आहे, अशोकराव चव्हाण असो किंवा कोणीही असो आम्हाला न्याय पाहिजे, असे यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटले.

आणखी वाचा

... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: पंकजा मुंडेंनी दाखवली अंतरवाली सराटीत येण्याची तयारी,  जरांगे म्हणाले, 'आम्ही खुनशी अथवा जातीयवादी नाही'
पंकजा मुंडेंनी दाखवली अंतरवाली सराटीत येण्याची तयारी, जरांगे म्हणाले, 'आम्ही खुनशी अथवा जातीयवादी नाही'
Amravati News : भर रस्त्यात वीजेचा खांब, खांबावर खाट टाकला, ऐटीत बसून आंदोलन, मागणी नेमकी काय?
भर रस्त्यात वीजेचा खांब, खांबावर खाट टाकला, ऐटीत बसून आंदोलन, मागणी नेमकी काय?
पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्या माजोरड्या बिल्डरला अद्दल घडली, कुणाल बाकलीवाल विरोधात छ. संभाजीनगरध्ये गुन्हा दाखल
पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्या माजोरड्या बिल्डरला अद्दल घडली, कुणाल बाकलीवाल विरोधात छ. संभाजीनगरध्ये गुन्हा दाखल
Kolhapur News : हाच खरा प्रजासत्ताक!, विधवांनाही विवाहित आणि सौभाग्यवतींप्रमाणेच सन्मान, कोल्हापुरातील ग्रामपंचायतीचा एकमुखी ठराव
हाच खरा प्रजासत्ताक!, विधवांनाही विवाहित आणि सौभाग्यवतींप्रमाणेच सन्मान, कोल्हापुरातील ग्रामपंचायतीचा एकमुखी ठराव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सChhaava Movie : Raj Thackeray भेटीनंतर Laxman Utekar यांचा निर्णय; 'छावा'तील तो सीन डिलीट करणार!Anil Deshmukh : Akshay Shinde व  Walmik karad प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम सुरुयAkash Kanaujiya On Mumbai Police : पोलिसांच्या चुकीमुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, कनौजियाचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: पंकजा मुंडेंनी दाखवली अंतरवाली सराटीत येण्याची तयारी,  जरांगे म्हणाले, 'आम्ही खुनशी अथवा जातीयवादी नाही'
पंकजा मुंडेंनी दाखवली अंतरवाली सराटीत येण्याची तयारी, जरांगे म्हणाले, 'आम्ही खुनशी अथवा जातीयवादी नाही'
Amravati News : भर रस्त्यात वीजेचा खांब, खांबावर खाट टाकला, ऐटीत बसून आंदोलन, मागणी नेमकी काय?
भर रस्त्यात वीजेचा खांब, खांबावर खाट टाकला, ऐटीत बसून आंदोलन, मागणी नेमकी काय?
पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्या माजोरड्या बिल्डरला अद्दल घडली, कुणाल बाकलीवाल विरोधात छ. संभाजीनगरध्ये गुन्हा दाखल
पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्या माजोरड्या बिल्डरला अद्दल घडली, कुणाल बाकलीवाल विरोधात छ. संभाजीनगरध्ये गुन्हा दाखल
Kolhapur News : हाच खरा प्रजासत्ताक!, विधवांनाही विवाहित आणि सौभाग्यवतींप्रमाणेच सन्मान, कोल्हापुरातील ग्रामपंचायतीचा एकमुखी ठराव
हाच खरा प्रजासत्ताक!, विधवांनाही विवाहित आणि सौभाग्यवतींप्रमाणेच सन्मान, कोल्हापुरातील ग्रामपंचायतीचा एकमुखी ठराव
Nashik Crime : पंचवटी हादरली! 20 वर्षीय महिलेला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार, अत्याचार करणारा नातेवाईकच
पंचवटी हादरली! 20 वर्षीय महिलेला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार, अत्याचार करणारा नातेवाईकच
Baburao Chandere : बिल्डरला उचलून रस्त्यावर आदळले, तरी बाबुराव चांदेरेंना अटक करणं बंधनकारक नाही! पुणे पोलिसांकडून वाचवण्याचा प्रयत्न?
बिल्डरला उचलून रस्त्यावर आदळले, तरी बाबुराव चांदेरेंना अटक करणं बंधनकारक नाही! पुणे पोलिसांकडून वाचवण्याचा प्रयत्न?
Chandrapur News: 19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
Baburao Chandere : अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
Embed widget