एक्स्प्लोर
Bhandara : विदर्भातील प्रसिद्ध अड्याळ घोडायात्रेला उत्साहात प्रारंभ
विदर्भाची (Vidarbha) काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथील प्रसिद्ध घोडायात्रेला (Adyal Ghoda Yatra) उत्साहात सुरुवात झाली .
Bhandara Adyal Ghoda Yatra
1/10

विदर्भाची (Vidarbha) काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथील प्रसिद्ध घोडायात्रेला (Adyal Ghoda Yatra) उत्साहात सुरुवात झाली आहे.
2/10

जगन्नाथपुरीप्रमाणं याठिकाणीही हातानं लाकडी रथ ओढण्याची परंपरा आहे. ही परंपरा 150 वर्षांपासून सुरु आहे. मध्यरात्री पुजा झाल्यानंतर श्रीहरी बालाजी महाराजांची लाकडी मूर्तीची लाकडी घोड्याच्या रथावरुन भव्य मिरवणूक काढण्यात आली.
3/10

अड्याळमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहत घोडायात्रेला संपन्न होते. विशेष म्हणजे या ठिकाणी जगन्नाथपुरीप्रमाणे हातानं रथ ओढण्याची परंपरा आजही कायम आहे.
4/10

या यात्रेसाठी विदर्भातूनचं नव्हे तर, अवघ्या महाराष्ट्रासह लगतच्या मध्य प्रदेश, छतीसगड राज्यातून मोठ्या संख्येनं भाविक अड्याळमध्ये दाखल झाले आहेत.
5/10

भोसले काळापासून ही रथ घोडायात्रा सुरु असून तब्बल 150 वर्षांचा कालावधी आता पूर्ण झाला आहे.
6/10

हनुमान मंदीरातून या घोडायात्रेला प्रारंभ होतो. ढोलताशा, डीजेच्या तालावर शेकडो तरुणाई भन्नाट डान्स करत श्रीहरी बालाजी महाराजांचा जयघोष करत घोडारथाची नगर भ्रमंती करत रथ बाजार ग्राऊंडवर थांबवतात.
7/10

हनुमान जयंतीपर्यंत हा घोडारथ भाविकांच्या दर्शनासाठी बाजार ग्राऊंडवर ठेवण्यात येतो. मध्यरात्रीला नगर भ्रमणासाठी निघालेल्या या रथाला तरुणाई मोठ्या उत्साहात सहभागी होते. रथाची पहाटेपर्यंत मिरवणूक काढतात.
8/10

यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
9/10

श्रीराम जन्मोत्सव ते हनुमान जयंतीपर्यंत आठ दिवस ही यात्रा चालणार आहे. दरवर्षी या कार्यक्रमात हजारोच्या संख्येनं भाविक सहभागी होत असतात.
10/10

हनुमान मंदीरातून या घोडायात्रेला प्रारंभ होतो. ढोलताशा, डीजेच्या तालावर शेकडो तरुणाई थिरकरली.
Published at : 31 Mar 2023 08:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
ठाणे
हिंगोली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion