एक्स्प्लोर
PHOTOS : गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात, 8 जण ठार, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Gondia Shivshahi Bus Accident : गोंदियामध्ये शिवशाही बस उलटून भीषण अपघात झाला आहे, यात 8 जण जागीच ठार झाले आहेच. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मृतांना 10 लाखांची मदत जाहीर केली.

Gondia Shivshahi Bus Accident
1/11

गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात (Gondia Shivshahi Bus Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे.
2/11

शिवशाही बसच्या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. सध्या बचाव कार्य सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
3/11

अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
4/11

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी आणि डव्वा गावाजवळ नागपुरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस उलटली.
5/11

या अपघातात 7-8 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
6/11

घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
7/11

दरम्यान, गोंदिया एसटी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला दिले आहेत
8/11

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर अपघाताबाबत स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेतली.
9/11

भंडारा-गोंदिया बसचा अपघात गोंदियामध्ये झाला.
10/11

जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना देखील एकनाथ शिंदेंनी दिल्या.
11/11

बस अचानक उलटली कशी हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
Published at : 29 Nov 2024 02:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
ठाणे
हिंगोली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion