एक्स्प्लोर

Nanded Crime News : खळबळजनक! विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार; गुन्हा दाखल होताच मुख्याध्यापकानं आयुष्य संपवलं

Nanded Crime News: विद्यार्थिनीने अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने विष पिऊन आयुष्य संपवलं आहे. नांदेडच्या खासगी शाळेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

नांदेड : विद्यार्थिनीने अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने विष पिऊन आयुष्य संपवलं आहे. नांदेडच्या खासगी शाळेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा (Nanded Crime News) दाखल केला, यानंतर आरोपी मुख्याध्यापकाने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. 

आत्महत्येपूर्वी मुख्याध्यापकाने लिहिली होती चिठ्ठी 

पुढे आलेल्या माहितीनुसार, नांदेडमधल्या खासगी शाळेतील मुख्याध्यापकावर त्याच शाळेच्या विद्यार्थिनीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा आरोप झाला. यानंतर पीडित मुलीने याबाबत आपल्या कुटुंबियांना माहिती दिली आणि कुटुंबातील नातेवाइकांनी पोलीस स्टेशन गाठत  मुख्याध्यापकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला. मात्र गुन्हा दाखल झाल्याचे कळताच त्यानंतर आरोपी मुख्याध्यापकाने विष पित आपले आयुष्य संपवलंय.  आत्महत्या करण्यापूर्वी मुख्याध्यापकाने एक चिठ्ठीही लिहिली होती. 

घरासमोर खेळत असलेल्या 3 वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला 

शेतवस्तीवर घरासमोर खेळत असलेल्या 3 वर्षीय मुलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील तांदूळवाडी शिवारात शुक्रवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. ऋतुजा सचिन करडक वय 3 वर्षे राहणार तांदूळवाडी तालुका गंगापूर असे घटनेतील मयत मुलीचे नाव आहे. या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ऋतुजा ही आपल्या आई सोबत मामाच्या गावी वळण येथे आलेली होती. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घरासमोर खेळत असताना बिबट्याने अचानक मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. नातेवाईकांनी तिला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र सायंकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच मुलीच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयातच हंबरडा फोडला.

28 वर्षीय युवकाचा आढळला संशयास्पद मृतदेह 

यवतमाळच्या बाजार समितीच्या परिसरामध्ये एका 28 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. अक्षय निरंजन शेंडे असे मृत युवकाचे नाव आहे. अक्षय हा बाजार समितीमध्ये हमालीचे काम करीत होता.  27 मार्चला तो कामाला जातो म्हणून घरून निघून गेला होता. दरम्यान अक्षयचा मृतदेहच आढळून आला.  दरम्यान या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली. त्यामध्ये मृतकाच्या डोळ्याजवळ जखम आढळून आली तसेच खिशामध्ये विषारी औषध आढळून आले. त्यामुळे अक्षयने आत्महत्या केली, की त्याचा घातपात झाला याचा शोध शहर पोलीस ठाणे करीत आहे.

हे ही वाचा 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! ठाण्यातील अभियंत्याचा घातपातच, पत्नी आणि मेहुण्याने मिळून काढला काटा, घटनेचा CCTV समोर 
धक्कादायक! ठाण्यातील अभियंत्याचा घातपातच, पत्नी आणि मेहुण्याने मिळून काढला काटा, घटनेचा CCTV समोर 
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सुरुच, पाच दिवसात 2 कोटींचा माल जप्त, 192 आरोपींना अटक 
अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सुरुच, पाच दिवसात 2 कोटींचा माल जप्त, 192 आरोपींना अटक 

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर, दिल्लीत पहिला पंप सुरू; पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर, दिल्लीत पहिला पंप सुरू; पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
Embed widget