एक्स्प्लोर
Hair Oil : हे तेल केसांना मुळापासून मजबूत करते, आजपासून लावायला सुरुवात करा काही दिवसांतच दिसू लागेल परिणाम.
आम्ही तुम्हाला अशा काही तेलांबद्दल सांगणार आहोत जे केसांसाठी खूप फायदेशीर आहेत.

प्रदूषण आणि तणावामुळे केस कमकुवत होतात आणि तुटण्याच्या समस्या सुरू होतात. त्यामुळे केसांना आतून पोषण देणं अत्यंत गरजेचं आहे. केस निरोगी करण्यासाठी काही प्रकारच्या तेलाच्या साहाय्याने मालिश करणे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही तेलांबद्दल सांगणार आहोत जे केसांसाठी खूप फायदेशीर आहेत.(Photo Credit : pexels )
1/9

केसांना मुळापासून टोकापर्यंत संपूर्ण पोषण देण्यासाठी तेलाने मसाज करणे आवश्यक आहे. यामुळे केस मजबूत होतात (हेल्दी हेअर) आणि त्यात चमक टिकून राहते. पुरेशा पोषणामुळे ते अकाली पांढरे होत नाहीत आणि दुतर्फा, कोरडे आणि निर्जीव होऊन केस तुटत नाहीत. याशिवाय मसाज केल्याने तणावही दूर होतो. कदाचित याच कारणामुळे आमची आजी लहानपणी आमच्या केसांना मसाज करायची.(Photo Credit : pexels )
2/9

मात्र वाढते प्रदूषण, ताणतणाव आणि अस्वस्थ जीवनशैलीचा आपल्या केसांवर अतिशय नकारात्मक परिणाम झाला आहे, त्यामुळे आपले केस लवकर पांढरे होणे, कोरडे आणि निर्जीव होणे, कोरडे केस, कोंडा अशा अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. अशावेळी केसांशी संबंधित या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही केसांसाठी थोडे तेल वापरू शकता, ज्यामुळे केस काळे, लांब, दाट आणि मजबूत होतील.(Photo Credit : pexels )
3/9

ऑलिव्ह ऑईल केसांसाठी खूप फायदेशीर आहे. हे केसांची वाढ आणि नुकसान नियंत्रणास मदत करते. यात अँटी-ऑक्सिडेंट, जीवनसत्त्व -ई आणि ओलिक अॅसिड असते, जे केसांना आतून पोषण देण्याबरोबरच मजबूत बनवते. त्यामुळे या तेलाने शॅम्पू करण्यापूर्वी दोन तास आधी केसांना मसाज करणे खूप फायदेशीर ठरेल.(Photo Credit : pexels )
4/9

केसांच्या वेगवान वाढीसाठी आठवड्यातून किमान दोन दिवस जोजोबा तेलाने मसाज करावा. हे हायपोएलर्जेनिक आहे आणि केसांना मजबूत करते. याशिवाय तेलाने डोक्याला मसाज केल्यानेही कोंड्यापासून बचाव होतो.(Photo Credit : pexels )
5/9

अँटी-ऑक्सिडंट्स, फॅटी अॅसिड्स, जीवनसत्त्व -ए आणि जीवनसत्त्व -ई ने समृद्ध असलेले अर्गन ऑइल केसांना पोषण देण्याबरोबरच दाट ठेवण्यास मदत करते. हे सूर्याच्या अतिनील किरणांपासून केसांचे संरक्षण करते.(Photo Credit : pexels )
6/9

जीवनसत्त्व -ए, जीवनसत्त्व -डी, जीवनसत्त्व -ई आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिडअसलेले एवोकॅडो तेल केसांना खोलवर पोषण देते आणि त्यांना लांब आणि चमकदार बनवते.(Photo Credit : pexels )
7/9

केस किंवा त्वचेशी संबंधित समस्यांसाठी नारळ तेलाचा वापर फार प्राचीन काळापासून केला जात आहे. याचे कारण हे अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्मांनी समृद्ध आहे, जे केसांच्या संसर्गापासून संरक्षण करते. खोबरेल तेलाने मालिश केल्याने केस लांब, गडद जाड आणि मजबूत होतात.(Photo Credit : pexels )
8/9

जीवनसत्त्व -ई युक्त बदामाच्या तेलाची मालिश केल्याने केसांना भरपूर पोषण मिळते, ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात.(Photo Credit : pexels )
9/9

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )
Published at : 15 Apr 2024 12:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्रीडा
पालघर
लाईफस्टाईल
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion