एक्स्प्लोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Bollywood Actor Life: बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टारकिड्स आहेत, ज्यांनी आपल्या आई-वडिलांप्रमाणेच अभिनयाचा मार्ग निवडला. पण, यशाचं सर्वोच्च शिखर काही ते गाठू शकले नाहीत.

Bollywood Actor Life
1/8

दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील आणि ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर. या स्टारकिडनं एकट्यानं अनेक हिट चित्रपट दिले, नसले तरीसुद्धआ अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनयाद्वारे स्वतःला सिद्ध केलं आहे. प्रतीकचं बालपण खूप चढ-उतारांमधून गेलं. याबाबत फारच कमी लोकांना ठाऊक असेल... जन्म होताच आईचं छत्र हिरावलं गेलं आणि नंतर ड्रग्सच्या व्यसनानं आयुष्य बरबाद केलं. आज आम्ही तुम्हाला प्रतीक बब्बरच्या आयुष्यातील रंजक गोष्टींबाबत सांगणार आहोत.
2/8

खरं तर, प्रतीकच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे, त्याच्या जन्मानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्याची आई म्हणजे, दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला. प्रतिकनं आईला प्रत्यक्ष कधी पाहिलं नाही, पण त्यानं त्याच्या आईबाबत ऐकलं खूप आहे. जसजसा प्रतिक मोठा झाला, तसतसा तो एकटेपणानं ग्रासला. या एकटेपणानं प्रतीकलाही चुकीच्या मार्गावर ढकललं.
3/8

28 नोव्हेंबर 1986 रोजी मुंबईत जन्मलेल्या प्रतीक बब्बरचं संगोपन त्याच्या आजी-आजोबांनी केलं. विशेष म्हणजे, एकेकाळी प्रतीक त्याचे वडील राज बब्बर यांचा खूप तिरस्कार करत होता.
4/8

एका मुलाखतीदरम्यान प्रतीकनं यावर उघडपणे भाष्य केलं आहे. तो मोकळेपणाने बोलला आणि म्हणाला की, माझ्या वडिलांना माझं ऐकायलाही वेळ मिळाला नाही. प्रत्येकजण मला माझ्या आईच्या यशाच्या कहाण्या सांगतो. पण माझ्या मनात एक प्रश्न होता की, माझी आई माझ्यासोबत का नाही?
5/8

प्रतीकनं 2008 मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.'जाने तू या जाने ना' या चित्रपटात त्यानं जेनेलियाच्या भावाची भूमिका साकारली होती.
6/8

यानंतर 'एक दिवाना था' आणि 'धोबी घाट' यांसारख्या चित्रपटांतूनही त्यानं आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं. त्यानंतर अभिनेता 'मुल्क', 'बागी 2' आणि 'छिछोरे' यांसारख्या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये काम करत राहिला.
7/8

प्रतीक बब्बरनं एकदा सांगितलं होतं की, वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी त्याला ड्रग्जचं गंभीर व्यसन लागलं होतं. यानंतर वयाच्या 17 व्या वर्षी त्याला पुनर्वसन केंद्रात जावं लागलं, तेव्हाच तो व्यसनातून मुक्त होऊ शकला.
8/8

एका मुलाखतीत आपल्या करिअरबद्दल बोलताना प्रतीकनं सांगितलेलं की, माझ्या वाईट सवयींमुळे माझ्या करिअरचा आलेख खराब झाला आहे. पण आता मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं आहे.
Published at : 27 Nov 2024 07:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
ठाणे
हिंगोली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion