एक्स्प्लोर
Madha Lok Sabha Election Result 2024 : अकलूजचं 'शिवरत्न' गुलालानं न्हाऊन निघालं; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयानंतर जेसीबीतून गुलाल उधळून कुटुंबियांचा मोठा जल्लोष
Madha Lok Sabha Election Result 2024 : माढ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा 622213 मतांनी विजय झाला आहे.

Madha Lok Sabha Election Result 2024
1/9

लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच हाती लागला आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
2/9

या निवडणुकीत माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे.
3/9

भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांचा धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पराभव केला आहे.
4/9

धैर्यशील मोहिते पाटील यांना 622213 मतं मिळाली आहेत. तर रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्यापेक्षा 120837 मतांनी ते आघाडीवर होते.
5/9

दरम्यान, माढा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील भरघोस मतांनी विजयी झाल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह गगनात मावेनासा झाला आहे.
6/9

माढ्यातील त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी गुलाल उडवून विजयाचा जल्लोष साजरा केला आहे.
7/9

या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कुटुंबियांनी जेसीबीमधून गुलाल उडवून विजयाचा आनंद साजरा केला आहे.
8/9

या ठिकाणी पुरुषांबरोबरच महिलांचा उत्साहदेखील पाहण्यासारखा आहे.
9/9

एकूणच महाविकास आघाडीचा आणखी एक उमेदवार निवडून आल्याने माढ्यात प्रचंड, जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.
Published at : 05 Jun 2024 11:09 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
