एक्स्प्लोर

Disha Salian Postmortem Report : दिशा सालियनचा मृत्यू डोक्यावर जखम झाल्यामुळेच, पण बलात्कार नाही; पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर

Disha Salian Postmortem Report : दिशाच्या तोंडातून आणि नाकातून रक्त येत होतं, तिच्या शरीरावर जखमा झाल्याचं पोस्टमॉर्टम अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 

मुंबई : सुशांत सिहं राजपूतची माजी मॅनेंजर दिशा सालियन हिच्या मृत्यूवरुन महाराष्ट्र विधीमंडळात गोंधळ झाला होता. त्यातच आता तिचा पाच वर्षांपूर्वीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट एबीपी माझाच्या हाती लागला आहे. या अहवालात दिशाच्या डोक्यावर गंभीर इजा असून शरीरावर गंभीर जखमा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. पण दिशावर कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असं रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. 

दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होतं असं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असं रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. 

दिशाच्या वडिलांची नव्याने याचिका

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत या प्रकरणी नव्याने याचिका दाखल केली आहे.  सामुदायिक बलात्कार केल्यानंतर दिशाची हत्या करण्यात आली आहे असा आरोप सतीश सालियन यांनी त्यांच्या याचिकेतून केला आहे. 

या प्रकरणात पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. दिशाच्या शरीरावर जखमा झाल्या असून त्या अनैसर्गिक आहेत. पण तिच्यावर कोणताही बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार झाला नाही. त्यामुळे दिशाच्या वडिलांनी जो आरोप केला होता त्याचा पुरावा मात्र यातून समोर येत नाही. असं असलं तरी दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

दिशाचे पोस्टमॉर्टम हे पाच वर्षांपूर्वी करण्यात आलं असून ते राजकीय दबावातून करण्यात आल्याचा आरोप दिशाचे वडील सतीश सालियन यांनी केला आहे. 

दिशा सालियन प्रकरणावरुन भाजपकडून राजकीय सूड उगवला जात आहे असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. दिशा सालियन यांच्या वडिलांचे समाधान होईपर्यंत लढावं, फक्त त्याच्या लढण्याचं राजकीय भांडवल होऊ देऊ नये असंही सुषमा अंधारे म्हणाल्या. 

दरम्यान, दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही या मुद्द्यावरून गोंधळ निर्माण झाला होता. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
Chhatrapati Sambhjinagar: मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
Maharashtra Zilla Parishad Election 2026: इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
Jalgaon Election Result 2026: जळगाव महापालिकेत महायुतीचा बोलबाला? बहुतांश उमेदवार आघाडीवर, कोण ठरणार किंगमेकर? वाचा एका क्लिकवर...
जळगाव महापालिकेत महायुतीचा बोलबाला? बहुतांश उमेदवार आघाडीवर, कोण ठरणार किंगमेकर? वाचा एका क्लिकवर...
Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Embed widget