महिन्याला फक्त 5000 रुपये कमवणाराही बनू शकतो 'करोडपती, 'हा'आहे गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्म्युला?
प्रत्येकालाच आपल्या उत्पन्नाचा काही भाग बचत करावा असे वाटते. मात्र, सर्वांना वाढत्या खर्चामुळं शक्य होत नाही. पण तुम्ही जर योग्य नियोजन केलं तर तुम्ही देखील मोठा निधी उभारु शकता.
Investment Plan: प्रत्येकालाच आपल्या उत्पन्नाचा काही भाग बचत करावा असे वाटते. मात्र, सर्वांना वाढत्या खर्चामुळं शक्य होत नाही. पण तुम्ही जर योग्य नियोजन केलं तर तुम्ही देखील मोठा निधी उभारु शकता. तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करणं गरजेचं आहे. तम्ही जर दरमहा फक्त 5000 रुपयांचीही बचत केली, तर भविष्यात तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा मिळवा
एसआयपीमध्ये पैसे गुंतवणूक आणि गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा मिळवून तुम्ही काही वर्षांत लक्षाधीश होण्याचे तुमचे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकता. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक 12 टक्के परतावा असतो. तुम्ही 27 वर्षे एसआयपीमध्ये दर महिन्याला सतत गुंतवणूक केल्यास, 12 टक्के दराने तुमचे 1.08 कोटी रुपये जमा होतील. या कालावधीत, तुमची गुंतवलेली रक्कम 16,20,000 रुपये असेल, तर परताव्यातून मिळणारे उत्पन्न 91,91,565 रुपये असेल. एकूणच तुम्ही रु. 1,08,11,565 (1.08 कोटी) जमा कराल.
तुम्ही 10000 रुपयांच्या गुंतवणुकीवर एवढी रक्कम जमा कराल
दुसरीकडे, जर तुम्ही तुमची बचत थोडीशी वाढवली आणि रु. 5000 ऐवजी 10000 रुपये SIP मध्ये गुंतवले तर तुम्ही फक्त 21 वर्षात करोडपती व्हाल. या कालावधीत गुंतवलेली रक्कम 25,20,000 रुपये असेल आणि परताव्यातून मिळणारे उत्पन्न 79,10,067 रुपये असेल. म्हणजे 21 वर्षांत तुम्ही 1,04,30,067 (1.04 कोटी) रुपये जमा कराल. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका जास्त फायदा तुम्हाला मिळेल, म्हणून बहुतेक गुंतवणूकदार लहानपणापासूनच पैसे वाचवण्याची शिफारस करतात जेणेकरून तुम्हाला दीर्घकालीन चक्रवाढ शक्तीचा जबरदस्त फायदा मिळेल.
आजच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध
आजच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पैशांची गुंतवणूक करताना दोन गोष्टी महत्वाच्या असतात यामध्ये ठेवलेली रक्कम सुरक्षीत राहील का? आणि दुसरे म्हणजे ठेवलेल्या रकमेवर परतावा किती मिळणार? जिकडे जास्त परतावा मिळतो तिकडो गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल असतो. यातील एक मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडतील SIP हा एक उत्तम पर्याय आहे. SIP द्वारे गुंतवणूक केल्याने तुम्हाला वार्षिक सरासरी 12 टक्के परतावा मिळू शकतो, जो पारंपारिक बचत योजनांपेक्षा जास्त आहे. एसआयपीमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठा फायदा होतो. कमी काळात जास्त लाभ मिळण्याची मोठी शक्यता असते.
महत्वाच्या बातम्या:























