(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ukraine-Russia War: पत्नीला खोटं बोलून घरातून निघाला, अन् युक्रेन सैन्यात सामील झाला
रशिया आणि युक्रेन युद्धाचा सर्वात मोठा फटका हा सामान्य नागरिकांना बसला आहे. अनेक युक्रेनचे नागरिक हे दुसऱ्या देशात स्थलांतर करत आहेत.
Ukraine-Russia War: रशिया आणि युक्रेन युद्धाचा सर्वात मोठा फटका हा सामान्य नागरिकांना बसला आहे. युद्धजन्य परस्थितीमुळे अनेक युक्रेनचे नागरिक हे दुसऱ्या देशात स्थलांतर करत आहेत. अशातच एक असा व्यक्ती ही आहे, ज्याने आपला देश सोडत युक्रेनच्या सैन्याची मदत करण्यासाठी, थेट युक्रेनमध्ये दाखल झाला आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीला आपण फेरफटका मारण्यासाठी बाहेर जात असून काहीच वेळात परततो, असं सांगितलं. मात्र या व्यक्तीने फेरफटका मारून घरी जाण्या ऐवजी विमानाचं तिकीट काढून थेट युक्रेन गाठलं.
द सनच्या वृत्तानुसार, ही व्यक्ती माजी सैनिक असून ब्रिटनमधील विरल (Wirral) येथील रहिवासी आहे. आपण फिरायला जात असल्याचे त्याने आपल्या पत्नीला सांगितले, परंतु त्याने फ्लाइट घेतली आणि थेट पोलंडला गेला आणि नंतर सीमा ओलांडून युक्रेनमध्ये प्रवेश केला. युक्रेनच्या सैन्याला मदत करण्यासाठी म्हणून हा ब्रिटीश नागरिक घराबाहेर पडला आहे. त्याला दोन मुले आहेत. या व्यक्तीने सांगितले की, जेव्हा त्याच्या पत्नीला हे कळेल, तेव्हा ती खूप अस्वस्थ होईल, म्हणून त्याने आपल्या पतींच्या न सांगता युक्रेनला जाण्याचा निर्णय घेतला.
या व्यक्तीने सांगितलं की, घरी परत गेल्यावर मी असं का केलं, हे माझ्या पत्नीला समजावून सांगेन. ब्रिटनमधून (Britain) युक्रेनला गेलेल्या या व्यक्तीने बराच काळ ब्रिटीश आर्मीमध्ये स्नायपर म्हणून काम केले आहे. या कठीण काळात आपण युक्रेनला मदत केली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. तेथील लोकांना मदत केली पाहिजे कारण युक्रेनच्या लोकांना सैनिकांची गरज असल्याचेही तो म्हणाला आहे. दरम्यान, ब्रिटनमधून अनेक लोक मदत करण्याच्या हेतूने युक्रेनमध्ये दाखल झाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
-
Russia Ukraine War : दोन अमेरिकन शास्त्रज्ञ अनेक महिन्यांपासून रशियन कॅप्सूलमध्ये बंद, बाहेर सुरु असलेल्या युद्धाची कल्पनाच नाही
- Ukraine Russia War : सुमी शहरातील विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी भारतीय दूतावासाची योजना, भारतीयांना तयार राहण्याच्या सूचना
- Google Maps : नेव्हिगेशनसाठी इंटरनेटची गरज नाही, अशा प्रकारे ऑफलाइन मोडमध्ये Google Maps