(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Google Maps : नेव्हिगेशनसाठी इंटरनेटची गरज नाही, अशा प्रकारे ऑफलाइन मोडमध्ये वापरा Google Maps
Google Maps : जेव्हा तुमच्या फोनमध्ये इंटरनेट काम करत नाही, तेव्हा Google Maps नेव्हिगेट करण्यात अडचण येते. आम्ही तुम्हाला इंटरनेटशिवाय गुगल मॅप कसे वापरायचे ते सांगणार आहोत.
Google Maps in Offline Mode : आपल्याला कोणत्याही नवीन ठिकाणी जाण्यासाठी फक्त Google Maps पुरेसे आहे. मात्र यासाठी फोनमध्ये इंटरनेट असणे अत्यंत आवश्यक आहे. बर्याच वेळा नेट पॅक संपल्यामुळे किंवा नेटवर्कच्या समस्येमुळे आपल्याकडे इंटरनेट उपलब्ध नसते. मग Google Maps कसे वापरता? येथे आम्ही तुम्हाला गुगल मॅप्स ऑफलाइन कसे वापरायचे ते सांगणार आहोत.
गुगल मॅपवर तुम्हाला कोणतेही ठिकाण किंवा क्षेत्र सेव्ह करण्याची सुविधा दिली जाते. मात्र, फोनमध्ये इंटरनेट चालू असतानाच तुम्हाला हे काम हाताळावे लागेल. नंतर तुम्ही हा सेव्ह केलेला डेटा ऑफलाइन मोडमध्ये वापरू शकता. ही पद्धत Android आणि iOS दोन्ही स्मार्टफोनवर काम करते. त्याची पद्धत जाणून घेऊयात.
ऑफलाइन मोडमध्ये Google Maps कसे वापरायचे?
स्टेप 1 : तुमच्या स्मार्टफोनवर Google Maps अॅप उघडा.
स्टेप 2 : नंतर वरच्या डावीकडे तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा आणि 'ऑफलाइन मॅप' निवडा.
स्टेप 3 : त्यानंतर 'स्वतःचा नकाशा निवडा' वर क्लिक करा आणि तुम्हांला जिथे जायचे आहे ते ठिकाण निवडा.
स्टेप 4 : यानंतर मॅप डाउनलोड केला जाईल आणि तुम्ही तो ऑफलाइन देखील अॅक्सेस करू शकता.
इंटरनेटशिवाय Google Maps वापरण्यासाठी, नकाशा (Maps) आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करणे आवश्यक आहे. विशेष बाब म्हणजे जेव्हाही तुम्ही फोनला वाय-फायशी कनेक्ट कराल तेव्हा डाउनलोड केलेले नकाशे आपोआप अपडेट होतील.
महत्वाच्या बातम्या :
- Samsung Galaxy F23 5G : लवकरच लाँच होणार सॅमसंगचा नवा फोन, 'हे' असतील फिचर्स
- OnePlus Nord 3 : 150W फास्ट चार्जिंगसह OnePlus Nord 3 लवकरच होणार लॉंच, जाणून घ्या फीचर्स...
- Instagram Feature : Instagram बंद करतंय 'हे' अॅप, फायदा होणार की नुकसान जाणून घ्या...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha