(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुतिन, समोरा-समोर या आणि दोन हात करा; इलॉन मस्कचे पुतिन यांना थेट लढतीचे आव्हान
Russia Ukraine War : किव्हच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर-पूर्व सीमेवर अजूनही युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनचा बराच भाग ताब्यात घेतला आहे.
Elon Musk : इलेक्ट्रिक कार निर्मिती करणाऱ्या टेस्ला कंपनीचा मालक आणि अब्जाधीश असलेल्या इलॉन मस्कने आता रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना थेट आव्हान दिलं आहे. रशियन अध्यक्ष हे भित्रे असून त्यांनी आपल्यासोबत येऊन एकास-एक लढत द्यावी असं आव्हान इलॉन मस्कने दिलं आहे. युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे त्याने पुतिन यांच्यावर टीका केली आहे.
इलॉन मस्क यांने यासंबंधी एक ट्वीट केलं आहे. त्याने म्हटलं आहे की, "मी पुतिन यांना सरळ समोरा-समोरच्या लढाईचं आव्हान देतोय. यामध्ये युक्रेन दाव लागलेला असेल." पुतिन तुम्ही या लढाईसाठी तयार आहे का? असा सवालही त्याने केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या ट्वीटमध्ये त्याने रशियाच्या राष्ट्रपती भवनच्या म्हणजे क्रेमलिनच्या ट्विटर हॅन्डलला टॅग केलं आहे.
I hereby challenge
— Elon Musk (@elonmusk) March 14, 2022
Владимир Путин
to single combat
Stakes are Україна
स्टारलिंकच्या माध्यमातून मस्कने केली युक्रेनची मदत
रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील इंटरनेट ठप्प झाल्याचं चित्र होतं. त्यावर इलॉन मस्कच्या मालकीच्या स्पेसएक्सने स्टारलिंक वापरकर्त्यांना मदत पाठवली होती.
खेरसानमध्ये रात्रभर बॉम्बच्या धमाक्यांचा आवाज
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाचा आज 19 वा दिवस असून रशियाच्या ताब्यात आलेल्या खेरसान या समुद्रकिनारी शहरामध्ये रात्रभर बॉम्बच्या धमाक्यांचे आवाज येत होते. उत्तर भागात असलेल्या चर्निहाईव्ह या शहरात रात्रभरात तीनवेळा हवाई हल्ले करण्यात आले आहेत. या भागातील बहुतांश शहरात वीज नसल्याने घरे आणि इमारतींना गरम राखणारी प्रणाली काम करत नाही. या शहरांमध्ये कर्मचारी वीज सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत असले तरी सततच्या गोळीबारामुळे त्यांना अडचणी येत आहे.
संबंधित बातम्या: