Trending Video : दिव्यांगाच्या मेहनतीने जिंकली लाखोंची मनं; सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव, पाहा हा व्हिडीओ
Trending Video : सोशल मीडियावर एका अपंग व्यक्तीच्या मेहनतीचा व्हिडीओ नेटऱ्यांना भावूक करत आहे.

Trending Video : असं म्हणतात कोणतंही काम करताना लाज बाळगायची नसते. परंतु, हा व्हिडीओ तुम्हा-आम्हाला लाजवणारा आहे. अनेकदा लोक विनाकारण काम करायला लाजतात. कामाचा कंटाळा करतात. त्यामुळे अनेकवेळा ते शारीरिक आणि मानसिक दुर्बलतेचा उल्लेख करतात. परंतु, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ज्या व्यक्तींना कामाचा कंटाळा येतो त्यांना प्रेरणा देणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक अपंग व्यक्ती काम करताना दिसत आहे. तो आपल्या उदरनिर्वाहासाठी हातगाडीवर नूडल्स बनवून विकताना दिसतोय. सोशल मीडिया यूजर्स व्यक्तीच्या या कर्तव्याला सलाम करत आहेत. याबरोबरच तरूणाच्या मेहनतीने लोकांची मनं जिंकली आहेत.
पाहा हा व्हिडीओ :
It will cost you $0 to retweet 💞
— Rahul Mishra (@DigitalRahulM) April 5, 2022
Responsibility 💔 pic.twitter.com/eJ3OwtFW1N
काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एका दिव्यांग व्यक्तीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओतील अपंग तरूण जे लोक कामासाठी टाळाटाळ करतात त्या सर्वांना प्रेरणा देणारा आहे. ज्याचा एक हात नाही आणि दुसऱ्या हाताला तळहाताचा भाग नाही, अशी व्यक्ती मोठ्या मेहनतीने आणि झोकून देऊन काम करताना दिसते आहे. हा व्यक्ती हातगाडीवर नूडल्स बनवताना दिसतोय. व्हिडिओ पाहून नेटिझन्स भावूक झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला लोक पसंत करत आहेत. दिव्यांग तरूणाच्या कार्याचे लोक कौतुक करत आहेत. तसेच त्यांच्या कार्याला सलाम देत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला हजारो लोकांनी लाइकही केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
Viral Video : अचानक आकाशातून समुद्रात कोसळलं विमान, पाहा व्हिडीओ
Viral Video : सिंहीणीचा शिकारीचा डाव फसला, म्हशींनी केलं धोबीपछाड; पाहा थक्क करणारा व्हिडीओ
Viral : माकडाकडून तीन वर्षाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न, पुढे काय झालं पाहा...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
