Ratnagiri Accident : पुण्यातील घटना ताजी असतानाच आता रत्नागिरीतही कारने 2 तरुणांना उडवले
Ratnagiri Accident : रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri Accident) मंडणगड शहरातील नगरपंचायत समोरील रोडवर दोन पादचारी तरुणांना कारने उडवलय.

Ratnagiri Accident : रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri Accident) मंडणगड शहरातील नगरपंचायत समोरील रोडवर दोन पादचारी तरुणांना कारने उडवलय. मात्र दोन्ही तरुण बोनेटवर आदळल्याने सुदैवाने बचावले. कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु, हा चित्तथरारक प्रसंग सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शहरात सामान खरेदी करून दोन तरुण बसस्थानकाकडे जात असतानाच अचानक पाठीमागून आलेल्या कारने लागोपाठ दोन तरुणांना उडवले. परंतु सुदैवाने दोन्ही तरुण गाडीच्या दर्शनी भाग बोनेटवर आदळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कार भरधाव वेगात नसल्याने सुदैवाने दोन्ही तरुण बचावले (Ratnagiri Accident) आहेत. परंतु तरुणांना उडवणाऱ्या कारचालकाला मात्र नागरिकाच्या रोशाला बळी पडावे लागले. काही काळ वातावरणही तंग झाले होते. मात्र काही लोकांच्या मदतीने प्रकरण निवळल्याचे बोलले जात आहे.
पुण्यात बिल्डरच्या मुलाच्या कारने दोघांना चिरडलं
पुण्यात रविवारी बड्या उद्योगपतीच्या मुलाच्या कारने दोन तरुणांना चिरडलंय. कारने दिलेल्या धडकेत दोन अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला जमावान चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलाने तरुणांना उडवल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे बिल्डरच्या मुलाला जामीन देखील मिळालाय. त्यामुळे हे प्रकरण राज्यात चांगलच तापताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
पोहायला गेलेल्या दोघांचा मृत्यू
दरम्यान, रत्नागिरीत मित्रांबरोबर दुपारी नदीवरती पोहायला गेलेल्या पाच मित्रांपैकी दोघा जणांचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झालाय. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील तुंबाड येथील जगबुडी नदीत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सौरभ हरिश्चंद्र नाचरे (वय 19) आणि अंकेश संतोष भागणे (वय 20) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. गेले तीन ते चार दिवस पडणाऱ्या मुसळधार अवकाळी पावसामुळे सर्वच नदीच्या पाण्याची पातळी काही प्रमाणात वाढत असून दुपारच्या वेळी पोहायला जाणाऱ्यांनी काळजी घ्यावी पाण्याचा अंदाज असल्याशिवाय तसेच पोहता येत नसल्यास पाण्यात जाऊ नये असे आवाहन खेड पोलिसांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Live Updates: दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 38.77 टक्के मतदान, दिंडोरीत सर्वाधिक तर कल्यामध्ये मतदारांचा निरुत्साह
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
