Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Live Updates: पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48.66 टक्के मतदान, दिंडोरीत सर्वाधिक 57 टक्के तर कल्याणमध्ये सर्वाधिक कमी 41 टक्के
Lok Sabha 5th phase voting LIVE : लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election voting 2024) महाराष्ट्रातील पाचवा आणि शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. मतदानाचा टक्का वाढवण्याचं सर्वांचं लक्ष आहे.
LIVE
Background
मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election voting 2024) पाचव्या टप्प्यात आज मतदान होत आहे. महाराष्ट्रातील हा शेवटचा टप्पा आहे. या शेवटच्या टप्प्यात मुंबईतील 6, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या 13 मतदारसंघात मतदान होत आहे. मुंबईत सकाळच्या टप्प्यात सेलिब्रिटी आणि राजकीय नेते मतदानाच्या रांगेत पाहायला मिळालं. मतदानाचा हक्क बजावा, जास्तीत जास्त मतदान करा, असं आवाहन राजकीय नेते, सेलिब्रिटींकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात सायंकाळी 5 वाजपर्यंत कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले? याची आकडेवारी जाणून घेऊयात...
महाराष्ट्र सरासरी – 48.66 टक्के
भिवंडी 48.89 टक्के
धुळे -48.81 टक्के
दिंडोरी – 57.06 टक्के
कल्याण – 41.70 टक्के
उत्तर मुंबई – 46.91 टक्के
उत्तर मध्य मुंबई – 47.32 टक्के
उत्तर पूर्व मुंबई – 48.67 टक्के
उत्तर पश्चिम मुंबई – 49.79 टक्के
दक्षिण मुंबई - 44.22 टक्के
दक्षिण मध्य मुंबई – 48.26 टक्के
नाशिक - 51.16 टक्के
पालघर – 54.32 टक्के
ठाणे – 45.38 टक्के
Mumbai Lok Sabha Election : कुलाबामध्ये ठाकरे- भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने, राहुल नार्वेकरांच्या भेटीवेळी जोरदार घोषणाबाजी
कुलाबा येथे ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि भाजप पदाधिकारी आमने सामने आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मतदान केंद्रावर आढावा घेण्यासाठी आल्यानंतर किरकोळ कारणांवरून भाजप आणि सेनेच्या ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी सुरू असताना वेळीच पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण हाताळले. कुलाबा येथील म्युनसिपल सेंकडरी स्कूल येथील मतदान केंद्रावर प्रकार घडला.
राहुल नार्वेकर मतदान केंद्रावर आले असता ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा दिल्या. सध्या मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची पोलिसांची माहिती आहे.
Devendra Fadanvis : उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू झालं, पराभव समोर दिसत असल्याने मोदींवर त्यांनी टीका केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विरोधकांना मतदान होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर विलंब लागत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.
मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली.
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 20, 2024
आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची…
Maharashtra Lok Sabha Election : पार्ल्यामध्ये संथ गतीने मतदान, मतदार हैराण होऊन परत निघाले
मुंबई- पार्ल्यामध्ये मतदान प्रचंड संथ गतीने होत आहे. शहाजीराजे मार्ग मनपा शाळेत रांगाच रांगा लागल्या आहेत. त्यामुळे नागरिक हैराण होऊन परत जात आहेत.
Nashik Lok Sabha : सिडकोतील मतदान केंद्रावर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ
सिडको परिसरातील मतदान केंद्रावर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. मतदान केंद्रात जेवणाचे डबे घेऊन जाण्यावरून महायुतीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत हुज्जत घातली आहे. गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतले.
Nashik lok Sabha : माजी नगरसेवक प्रशांत दिवे पोलिसांच्या ताब्यात
नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदानाची दिवशी अनेक घडामोडी घडत आहेत. आता माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रशांत दिवे हे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहे. शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप दिवे यांनी केला. त्यामुळे वाद झाला होता. मात्र शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पळ काढला. तर दिवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.