एक्स्प्लोर

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात सर्वात मोठा ट्वीस्ट; हत्यारं पुरवणारा आरोपी अटकेत

Pune Crime: आरोपींना संगम वाघमारेनं या वीस वर्षांच्या मुलानं शस्त्र पुरवल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेनं आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Pune News : पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्या हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. वनराज आंदेकर हत्याप्रकरणात शस्त्र पुरविणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. संगम संपत वाघमारे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपींना शस्त्रं पुरविण्यात वाघमारे सामील असल्याचामुळे पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, वनराज आंदेकर हत्याप्रकरणात आतापर्यंत तब्बल 15 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आंदेकर यांच्या तीन बहिणींसोबतच तीन अल्पवयीनांनचाही समावेश आहे. 

पुण्यातील (Pune Crime) वनराज आंदेकरांचा गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे. आरोपींना संगम वाघमारेनं या वीस वर्षांच्या मुलानं शस्त्र पुरवल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेनं आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी सापळा लावून मोठ्या शिताफीनं आरोपीला पकडल्याची माहिती मिळत आहे. वाघमारेला अटक करून रविवारी न्यायलायात हजर करण्यात आले. त्याला 11 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.        

पुण्यात सातत्यानं घडणाऱ्या धक्कादायक घटनांमुळे सुसंस्कृत पुण्यात नेमकं काय सुरूय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 31 ऑगस्टच्या दिवशी रात्री पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करत त्यांची भर चौकात हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पुणं पुरतं हादरुन गेलं. 6 ते 7 टू व्हीलरवरुन 13 ते 14 जण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग केली, कोयत्यानं हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 

नेमकं काय घडलेलं?

सहा ते सात टू व्हीलरवरुन तेरा ते चौदा जण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग केली आहे. गोळीबार करताना गोळ्या लागल्या नाहीत म्हणून आंदेकरांवर मारेकऱ्यांनी कोयत्यानं वार केले. हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी अगोदर चौकातील लाईटही घालवली होती. शिवाय आंदेकर एकटेच असल्याचा अंदाज घेत आरोपींनी आंदेकर यांच्यावर हल्ला केला आहे. घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांच्यावर कोयत्यानं वारही केले. गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले. त्यानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली. सध्या हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं असून पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget