एक्स्प्लोर

Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य

Jalgaon Crime : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतरही जळगावमध्ये छेडछाडीचे प्रकार सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे.

Jalgaon Crime : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारानंतरही जळगाव जिल्ह्यात मुलींच्या छेडछडीच्या घटना सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय.  

धरणगाव तालुक्यातील एका गावात टवाळखोरांनी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून मुलीची आणि तिच्या बहिणीची छेडखानी करत मारहाण केल्याचा आरोप मुलीने केला आहे. टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असून जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणामुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीला टवाळखोर शाळेत जाताना, शेतात जाताना पाठलाग करून वारंवार त्रास देत होते. अल्पवयीन मुलीने टवाळखोरांना विरोध केल्याने टवाळ खोरांनी थेट मुलीच्या घरात घुसून पीडित मुलीची व बहिणीची छेडखानी करत बहिणीला मारहाण केल्याचा आरोप पीडित मुलीसह तिच्या पित्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर केला आहे. 

पालकमंत्र्यांसमोर सांगितली आपबिती

छेडछाडीच्या या प्रकरणात पोलिस आता काय कारवाई करतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीडित मुलीशी भेट घेऊन तिच्या प्रकृतीची चौकशी करून धीर दिला आहे. पीडित मुलीच्या बहिणीने व पालकांनी पालकमंत्र्यांसमोर आपबीती कथन करत टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी पोलिसांना सापडेना

दरम्यान, मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांचा विरोधात गुन्हा दाखल केला होता, यातील तीन जणांना अटक तर एक अल्पवयीन ताब्यात घेत त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली होती. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र पीयूष मोरे, चेतन भोई आणि सचिन पालवे हे तिघे जण पोलिसांनी शोध घेऊनही सापडू शकले नसल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune Hinjwadi Bus Fire: माझ्या नवऱ्याला विनाकारण गोवलं जातंय, जळालेल्या बसमध्ये चालकाचे सख्खे भावोजी; हंबर्डीकरांच्या पत्नीचा दावा, नेमकं काय सांगितलं?

Washim News : अखेर 9 दिवसानंतर अपहरण झालेल्या 14 वर्षीय मुलाचा शोध लागला, पण...; शेतकरी कुटुंबावर शोककळा, वाशिम हादरलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
Vijay Wadettiwar & Yogesh Kadam : महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal Majha Vision : सावरकर ते औरंजेबाची कबर...हर्षवर्धन सपकाळांची स्फोटक मुलाखतDevendra Fadnavis Majha Vision Full : बेधडक उत्तरं, तुफान फटकबाजी! दवेंद्र फडणवीस भरभरुन बोलले..Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिल्यास...Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
Vijay Wadettiwar & Yogesh Kadam : महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
Imtiaz Jaleel Majha Vision : औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Rohit Pawar : औरंगजेबचा मुद्दा फ्लॉप गेला, आरएसएसनेही भाजपला वाऱ्यावर सोडलंय; रोहित पवारांचा खोचक टोला
औरंगजेबचा मुद्दा फ्लॉप गेला, आरएसएसनेही भाजपला वाऱ्यावर सोडलंय; रोहित पवारांचा खोचक टोला
CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र
CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र
Embed widget