Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांचं आपल्या लाईफ पार्टनरवर असतं नितांत प्रेम; बायकोसाठी तर असतात 'लकी चार्म'
Numerology Of Mulank 4 : कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो. मूलांकाच्या आधारे आपल्याला अनेक गोष्टींचा अंदाज लावता येतो.

Numerology Of Mulank 4 : ज्योतिष शास्त्रात ज्याप्रकारे व्यक्तीच्या राशीनुसार, त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखला जातो. त्याचपद्धतीने अंकशास्त्रात (Ank Shastra) सांगितल्याप्रमाणे, व्यक्तीच्या मूलांक (Mulank) म्हणजेच जन्मतारखेवरुन त्याच्या स्वभावाचा अंदाज लावता येतो. व्यक्तीच्या आवडी-निवडी आणि गुण ओळखता येतात. अशाच प्रकारे आज आपण मूलांक 4 विषयी जाणून घेणार आहोत.
आपला लाईफ पार्टनरशी संबंधित प्रत्येक मुलींच्या अनेक अपेक्षा असतात. त्यानुसार, आपल्या लाईफ पार्टनरने आपल्यावर भरपूर प्रेम करावं अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते.
मूलांक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे. त्यामुळे मूलांक 4 च्या लोकांमध्ये जिद्धीची वृत्ती असते. त्यानुसार, कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो. मूलांकाच्या आधारे आपल्याला अनेक गोष्टींचा अंदाज लावता येतो. यासाठीच अंकज्योतिष शास्त्रानुसार, आज आपण कोणत्या मूलांक 4 च्या मुलांचा स्वभाव नेमका कसा असतो या संदर्भात जाणून घेणार आहोत.
कसा असतो स्वभाव?
मूलांक 4 असणाऱ्या मुलांचा स्वभाव फार जिद्दीचा असतो. ही मुलं शेवटपर्यंत आपल्या लाईफ पार्टनरवर प्रेम करतात. आपल्या पार्टनरचा विश्वास जिंकण्यासाठी आणि तिच्यावर प्रेम करण्यासाठी हे लोक वाट्टेल त्या थराला जाऊ शकतात. ज्या मुलीवर यांचं प्रेम असतं त्यांचा विश्वास ते जिंकून राहतात. तसेच, हे लोक खरं प्रेम मिळवून राहतात. आपल्या पार्टनरला कधीच एकटं सोडत नाहीत.
त्याचप्रमाणे, मूलांक 4 असणारे लोक आपल्या बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. इतकंच नव्हे तर, या जन्मतारखेचे लोक आपल्या पार्टनरच्या करिअरसाठी देखील फार लकी मानले जातात. त्यांचं करिअर घडविण्यासाठी यांचा चांगला सपोर्ट मुलीला मिळतो.
मूलांक 6 चा स्वभाव कसा असतो?
त्याचबरोबर, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला झालेला आहे. अशा लोकांचा मूलांक 6 असतो. मूलांक 4 प्रमाणेच मूलांक 6 चे लोक फार रोमॅंटिक असतात. यांचं देखील आपल्या बायकोवर नितांत प्रेम असतं.
मूलांक 6 चा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र ग्रह हा प्रेम आणि शांतीचं प्रतिक मानला जातो. या जन्मतारखेचे लोक आपल्या पार्टनरला खुश ठेवण्याचा अतोनात प्रयत्न करतात. तसेच, त्यांना करिअरमध्ये देखील सपोर्ट करतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Gochar 2025 : 29 मार्चपासून 'या' 2 राशींची होणार चांदी; शनीच्या ढैय्यापासून मिळणार मुक्ती, रखडलेली कामे होतील पूर्ण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

