Vastu Tips : सकाळी उठताच 'या' 5 वस्तूंपासून दूर राहा; वास्तूशास्त्रानुसार मानतात अशुभ
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार, सकाळची वेळ आपल्या प्रत्येकासाठी खास असते. मात्र, काही वस्तू अशा आहेत ज्यांना सकाळी पाहणं अशुभ ठरु शकतं.

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार, सकाळची वेळ आपल्या प्रत्येकासाठी खास असते. कारण आपली सकाळ ज्याप्रकारे जाते त्यावरच आपला पूर्ण दिवस अवलंबून असतो. असं म्हणतात की, सकाळी उठताच आपण काही गोष्टींना बघूनच आपला दिवस छान जातो. वास्तूशास्त्रात (Vastu Shastra) देखील अशाच काही गोष्टींबद्दल सांगण्यात आलं आहे. मात्र, काही वस्तू अशा आहेत ज्यांना सकाळी पाहणं अशुभ ठरु शकतं. सकाळच्या वेळी या वस्तू पाहणं किंवा नजरेस पडणं शुभ मानलं जातं. या वस्तू नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
बंद घड्याळ
सकाळी उठताच जर तुम्हाला बंद घड्याळ दिसलं तर हा शुभ संकेत मानला जात नाही. वास्तूशास्त्रानुसार, सकाळीत उठताच बंद घड्याळ पाहिल्याने तुमची कामे रखडू शकतात. त्यामुळे जर तुमच्या घरी घड्याळ बंद पडले असेल तर ते आधी दुरुस्त करुन घ्या.
झाडू आणि कचरा
वास्तूशास्त्रानुसार, सकाळी उठताच झाडू किंवा कचरा दिसल्यास तो अशुभ मानला जातो. यामुळे घरात आर्थिक तंगी येण्याची शक्यता असते. तसेच, घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. त्यामुळे या वस्तू सकाळी उठताच तुमच्या नजरेस पडणार नाहीत अशा ठिकाणी ठेवा.
खरकटी भांडी
जर तुम्ही सकाळी उठताच खरकटी भांडी पाहिली तर वास्तूशास्त्रानुसार, ते अशुभ मानलं जातं. यामुळे घरात वादविवाद वाढू शकतात. आणि तुमची चिडचिड होऊ शकते. त्यामुळे खरकटी भांडी रात्रीच धुण्याचा प्रयत्न करा.
सावली
वास्तूशास्त्रानुसार, सकाळी उठताच आपली सावली बघून तुमचं मन अशांत होऊ शकतं. यामुळे तुमचं कामदेखील पूर्ण होत नाही. तसेच, दिवसभर तुमच्या डोक्यात तेच विचार राहतात. त्यामुळे सकाळी उठताच तुमची सावली दिसणार नाही याचा प्रयत्न करा.
आरसा
काही लोकांना सकाळी उठताच आरसा बघायची सवय असते. पण, वास्तूशास्त्रानुसार, असं करणं अशुभ आहे. यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. आणि दिवसभर तुमचा दिवस सुस्त जाऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांचं आपल्या लाईफ पार्टनरवर असतं नितांत प्रेम; बायकोसाठी तर असतात 'लकी चार्म'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

