Dhanashree Verma : एकीकडे घटस्फोट! दुसरीकडे धनश्री कोर्टाबाहेर संतापली? आईने हात धरला अन् जे घडले ते झाले व्हायरल, Video
टीम इंडिया आणि आयपीएलचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा अखेर गुरुवारी 20 मार्च रोजी घटस्फोट झाला.

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce : टीम इंडिया आणि आयपीएलचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा अखेर गुरुवारी 20 मार्च रोजी घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या वेळी जेव्हा दोघेही न्यायालयात पोहोचले, तेव्हा धनश्री आणि चहल दोघांचेही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. यादरम्यान, घटस्फोटापूर्वी कोर्ट रूममध्ये जाण्यापूर्वी डान्स कोरिओग्राफर धनश्री वर्मा खूप रागावताना दिसली. धनश्री जेव्हा कोर्टरूममध्ये जात होती, तेव्हा तिने काळा मास्क, काळा गॉगल, पांढरा टॉप आणि निळी जीन्स घातली होती. यावेळी त्याची आईही त्याच्यासोबत होती.
कोर्टाबाहेर धनश्री संतापली...
घटस्फोटासाठी धनश्री घरून कोर्टात पोहोचली तेव्हा पापाराझींनी (Paparazzi) तिला घेरले. यादरम्यान, धनश्री डोके टेकवून आणि आईचा हात धरून कोर्टरूममध्ये जात होती. मग पापाराझी धनश्रीच्या मागे जाऊ लागले. धनश्री काहीही न बोलता शक्य तितक्या लवकर कोर्टात जाण्याचा प्रयत्न करत होती. पण गर्दीत एक महिला पडली. त्यानंतर धनश्रीने तिचा सगळा राग पापाराझींवर काढला.
View this post on Instagram
धनश्रीचा संतप्त व्हिडिओ व्हायरल
धनश्रीच्या रागाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, धनश्री आणि चहल गेल्या अडीच वर्षांपासून वेगळे राहत होते. धनश्रीने तिच्या आडनावातून चहल हे नाव काढून टाकल्यानंतर घटस्फोटाच्या बातमीला वेग आला.
लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट
कोरोना महामारीच्या काळात धनश्री आणि चहल यांचे लग्न 22 डिसेंबर 2020 रोजी झाले. लग्नाच्या चार वर्षातच या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही 5 फेब्रुवारी रोजी कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. ज्यावर न्यायालयाने 20 मार्च रोजी शिक्कामोर्तब केले. युजवेंद्र चहल आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध खेळताना दिसणार आहे.
युझवेंद्र चहल धनश्रीला किती देणार पोटगी?
धनश्री आणि युझवेंद्र चहल यांच्या मध्यस्थथीने पोटगीच्या अटींवरही अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानुसार चहलने धनश्रीला 4.75 कोटी रुपये देण्याचं मान्य केले आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल करताना दोघांनी संयुक्त याचिका दाखल केली होती. त्यावेळी दोघांनी सहा महिन्यांचा कूलिंग-ऑफ कालावधी माफ करण्याची विनंती केली होती. परंतु कौटुंबिक न्यायालयाने ती विनंती नाकारली. युझवेंद्रने धनश्रीला मान्य केलेल्या रकमेपैकी 2.37 कोटी रुपये आधीच दिले आहेत. आता पोटगीची उर्वरित रक्कम घटस्फोटाच्या आदेशानंतर देण्यात येईल.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

