Pune Ashadhi Wari News: वारीच्या मार्गावरील मांस आणि दारूची दुकाने राहणार बंद?
Pune Ashadhi Wari News: वारी मार्गावरील मास आणि दारुची दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. यासोबतच वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी अनेक सुविधा देण्यात येणार आहेत.

Pune Ashadhi Wari News: यंदाची आषाढीवारी वारकऱ्यांसोबत होणार आहे. त्यामुळे अनेकांचे डोळे वारीकडे लागले आहे. यातच पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसस्थितीत बैठक पार पडली. वारी रोडवरील रस्त्यालगतची मांस व दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे. कोरोना वाढत असला तरीदेखील आषाढवारी चांगलीच करु, असं देखील अजित पवार म्हणाले.
त्यावेळी पालखी मार्गांचे वेळापत्रक अजित पवार यांच्यासमोर मांडण्यात आले. तसेच पालखी मार्गात कोणत्या सुविधा दिल्या आहेत. अशी माहितीही अजित पवार यांना देण्यात आली. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आळंदी देवस्थानचे अध्यक्ष विकास ढगे, देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते. या बैठकीला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे उपस्थित होते.
वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी कोणत्या सुविधा आहेत?
पालखी मार्गावर दर पाच किलोमीटरवर स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली होती. 1 हजार 800 फिरती शौचालये दिली,50% फिरती शौचालये महिलांसाठी राखीव आहेत.पालखी मार्गावर जिल्हा परिषद विभागाकडून सॅनिटायझर, औषध, डॉक्टरची व्यवस्था वारसदारांच्या रस्त्यालगतची मांस व दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश होण्याची शक्यता आहे. वारसदारादरम्यान मोबाईल अॅप तयार करण्यात येणार आहे. विठ्ठल रुक्मिणीचे थेट दर्शनसुद्धा होणार असल्याचं बैठकीत ठरलं आहे.
वारी निर्बंधमुक्त होणार
राज्यात पून्हा एकदा कोरोना डोकं वर काढताना दिसत आहे. त्यात पुणे , मुंबईसारख्या अति लोकसंख्या असणाऱ्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र यंदाची आषाढी वारी निर्बंधमुक्त होणार त्यामुळे काळजी करु नका, अशी महिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्यानंतर यंदा आषाढी वारीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होईल, असे वाटत होते. मात्र, आता पुन्हा एकदा राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज सुमारे 1000 नवीन कोरोना रुग्णांचे निदान होत आहे. अशा परिस्थितीत यंदाच्या आषाढी वारीवर कोरोनाची विळखा राहणार का? असा प्रश्न विचारला जात आहे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
