एक्स्प्लोर

Daund Political News : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावरुन पोस्टर वॉर सुरु; काय आहे नेमकं प्रकरण?

दोन दिवांसापूर्वी  दौंड तालुक्यात खासदार संजय राऊत यांच्या आभाराचे बॅनर लावण्यात आले होते. आता दोघांमध्ये पोस्टरवॉरदेखील पाहायला मिळत आहे.

Daund Political News : दोन दिवांसापूर्वी  दौंड (Daund) तालुक्यात खासदार संजय राऊत यांच्या आभाराचे बॅनर लावण्यात आलेले. त्याच बॅनर शेजारी संजय राऊत यांच्या निषेध करणार बॅनर (Sanjay raut) (Rahul kul) लावण्याने दौंड तालुक्यात पोस्टर वॉर सुरू झालेलं आहे. खासदार (Political News) संजय राऊत यांनी 13 मार्चला भाजपचे आमदार व भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्यावर कथित पाचशे कोटींचा भ्रष्टाचारचा आरोप केला होता. आमदार कुल यांच्या समर्थकांनी राऊत यांनी केलेले हे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा करीत ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोडमारो, पुतळ्याचा दहन करून निषेध नोंदवला होता. 

आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांनी दौंड तालुक्यात मोर्चादेखील काढला होता. मात्र त्याला प्रत्युत्तर म्हणून खासदार संजय राऊत यांच्या आभाराचे फलक दौंड तालुक्यात झळकले होते. परंतु संजय राऊत यांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनर शेजारीच संजय राऊत यांचा निषेध करणारा बॅनर लावला आहे. राऊत यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या मालकीच्या असलेल्या भीमा पाटस सहकार कारखान्याच्या 500 कोटींच्या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला वाचा फोडली आहे. कर नाही तर डर कशाला, चौकशीला सामोरे जा, ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या वतीने जाहीर आभार, अशा आशयाचे बॅनर शेतकरी सभासदांनी दौंड शहरात ठिकठिकाणी तसेच पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लावले होते. आता त्याच बॅनर शेजारी संजय राऊत यांच्या निषेधाचे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र दोन्ही  बॅनरवर भीमा पाटसचे सुज्ञ शेतकरी म्हटले असेल तरी हे बॅनर कुणी लावले हे मात्र गुलदस्त्यात आहे.  

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी आमदार राहुल कुल यांच्या विरोधात कारखान्यात अनियमितता असल्याची तक्रार केली आहे. एकीकडे आमदार कुल यांच्या समर्थकाकडून खासदार राऊत यांचा निषेध होत आहे. तर दुसरीकडे खासदार राऊत यांच्या आभाराचे बॅनर लावण्यात आले होते. आता त्याच बॅनर शेजारी संजय राऊत यांच्या निषेधाचे बॅनर लावण्यात आले आहेत.. त्यामुळे दौंड तालुक्यात सध्या पोस्टर वॉर सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे. दौंड तालुक्यात भीमा पाटसच्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण चांगलेच तापले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आता नेमका हा वाद कोणामुळे थांबणार हे पाहणं महत्वाचं असेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget