माझ्या घरात गाडीचे मुख्य टायर पंक्चर होते, तेव्हा माझा स्टेपनीसारखा वापर करून पळवलं जातं : सुजय विखे
Sujay Vikhe-Patil, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Sujay Vikhe-Patil, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र मुंबईहून श्रीरामपूरच्या दिशेने निघालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना वेळेत कार्यक्रमासाठी पोहोचता आले नाही. त्यामुळे माजी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करत कार्यक्रम पार पडला. मात्र हाच धागा पकडत सुजय विखे यांनी मिश्किल भाष्य केल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
येण्याचा माझा फार संबंध येत नाही, आमच्या घरात माझी भूमिका स्टेपनीची आहे
सुजय विखे म्हणाले, या कार्यक्रमात येण्याचा माझा फार संबंध येत नाही, आमच्या घरात माझी भूमिका स्टेपनीची आहे. गाडीचे मुख्य टायर पंक्चर होते, तेव्हा माझा स्टेपनी सारखा वापर करून मला पळवलं जातं. साहेब याठिकाणी येऊ शकले नाहीत म्हणजे परिवाराचा मुख्य टायर काही कारणास्तव पळू शकलं नाही. त्यामुळे स्टेपनी म्हणून मी कार्यक्रमाला आल्याचे मिश्किल वक्तव्य सुजय विखे यांनी केलंय.
सुजयपर्व नावाने सुरु केले होते संपर्क कार्यालय
महिनाभरापूर्वी या कार्यालयाचे उद्घाटन देखील सुजय विखे यांनी केलं होते. या सोहळ्याला मोक्कातील आरोपी दीपक पोकळे हजर नसला तरी त्याचे फोटो असलेले फ्लेक्स परिसरात लागलेले होते. दीपक पोकळे याच्यावर राहता पोलीस ठाण्यात हत्या, गोळीबार आणि लूटमारीचे विविध गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर जेल बाहेर असून जेलमधून सुटल्यानंतर त्याने आपल्या मित्राच्या साथीने सुजयपर्व या नावाने संपर्क कार्यालय सुरू केलं. मात्र या संदर्भात सुजय विखे यांना विचारले असता त्यांनी माझ्या नावाचा जर असा कोणी गैरवापर करत असेल तर त्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या