Himachal Election: काँग्रेसने 46 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, एक जागा वगळता सर्व विद्यमान आमदारांना दिले तिकीट
Himachal Pradesh Assembly Election 2022: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

Himachal Pradesh Assembly Election 2022: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी उमेदवारांची पहिली यादी (Congress Candidate List 2022) जाहीर केली. काँग्रेसने पहिल्या यादीत 46 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. शिमला ग्रामीणमधून विक्रमादित्य सिंग, नादौनमधून सुखविंदर सिंग सुखू, थिओगमधून कुलदीप सिंग राठोड यांना तिकीट देण्यात आले आहे. विक्रमादित्य सिंह हे माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह आणि प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांचे पुत्र आहेत. सुखविंदर सिंग हे सुखू प्रचार समितीचे प्रमुख आहेत.
हिमाचल विधानसभेतील विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री यांना त्यांच्या विद्यमान विधानसभा मतदारसंघ हरोली येथून तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेसने एक जागा वगळता सर्व विद्यमान आमदारांना तिकीट दिले आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी (14 ऑक्टोबर) हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहे.
Congress releases the first list of 46 candidates for the Himachal Pradesh Assembly elections, which are to be held on November 12th. pic.twitter.com/O6ssJYyiEV
— ANI (@ANI) October 18, 2022
हिमाचलमध्ये 12 नोव्हेंबरला होणार मतदान
हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात 12 नोव्हेंबरला मतदान होणार असून 8 डिसेंबरला निकाल जाहीर केले जाणार आहेत. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर आहे. तर 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. हिमाचल प्रदेशात एकूण 55.07 लाख मतदार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले होते. राज्यात भाजप सत्तेत आहे. या निवडणुकीत भाजपला काँग्रेससह आम आदमी पक्षाचा सामना करावा लागणार आहे.
इतर महत्वाची बातमी:
भाजपही जाहीर करू शकते यादी
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असतानाच, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi), भाजप पक्षाध्यक्ष जेपी नड्डा (j p nadda) यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर भाजप आपल्या उमेदवारांची यादीही जाहीर करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
