एक्स्प्लोर

Nashik News : बांधावरून पाय घसरला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं... विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू, सिन्नर तालुक्यातील घटना

Nashik News : सिन्नर (Sinner) तालुक्यात एकाच आठवड्यात दोघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Sinner News : सिन्नर (Sinner) तालुक्यात एकाच आठवड्यात दोघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी एका महिलेचा तर आज एका शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिन्नर तालुक्यातील सुळेवाडी आणि डुबेरे येथील या दोघांचे दुर्दैवी निधन झाले आहे. 

सध्या पावसाळ्याचे (Rainy Season) दिवस असून अनेकदा शेतीकामात, घरकामात असताना विजेचा धक्का (Electric Shock) लागण्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे नागरिकांनी याबाबत सतर्क राहून काळजी घेणे महत्वाचे आहे. मात्र थोडे दुर्लक्ष झाल्यास अनुचित प्रकार घडत असतात. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दोन गावात एकाच आठवड्यात विजेच्या धक्क्याने दोघांना जीव (Death) गमवावा लागला आहे. सुळेवाडी येथील महिला सत्यभामा रामकृष्ण गुंजाळ, तर डुबेरे येथील शेतकरी शरद कारभारी वामने यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. त्यामुळे दोन्ही गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान या दोन्ही घटनांमुळे स्थानिक गावकऱ्यांनी वीज वितरणला धारेवर धरत संताप व्यक्त केला आहे. 

सुळेवाडी येथील (Sulewadi) पहिल्या घटनेत गुंजाळ यांच्या घराजवळ असलेल्या विजेच्या खांबावरून घरासाठी वीज कनेक्शन (Light Connection) घेण्यात आले आहे. 28 जून रोजी दुपारनंतर परिसरात पावसाला सुरुवात झाली. गुंजाळ यांच्या घराजवळ असलेल्या लोखंडी खांबावर विद्युत प्रवाह उतरला. त्या खांबावरूनच गुंजाळ यांच्या घरात कनेक्शन देण्यात आलेल्या विजेच्या ताराला सपोर्ट देण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी तारेतून विद्युत प्रवाह घरात उतरला. घराला असलेल्या पत्र्याच्या कंपाऊंडमध्येही विद्युत प्रवाह उतरला होता. यावेळी सत्यभामा या कंपाऊंडजवळ गेल्या असता त्यांना विजेचा धक्का बसल्याने त्या जमिनीवर कोसळल्या. जवळून जाणाऱ्या युवकांनी ग्रामस्थांना माहिती देत उपचारासाठी सिन्नरला खासगी रुग्णालयात (Sinner Hospital) हलवले. तेथून अधिक उपचारासाठी नाशिकला हलवीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

शेतात असताना विजेचा धक्का 

डुबेरे येथील दुसऱ्या घटनेत शेतातील काम उरकून घराकडे जात असताना विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शरद कुटुंबासह शेतात काम करण्यासाठी गेले होते. शेतातील काम उरकल्यानंतर अकरा वाजेच्या सुमारास ते घराकडे परतत होते. दोन-तीन दिवसांपासून पावसाची परिसरात रिपरिप सुरु असल्याने बांधावरून त्यांचा अचानक पाय सरकला. विजेच्या खांबासाठी असलेल्या तारेला त्यांच्या हाताचा स्पर्श झाला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने शरद जागेवरच बेशुद्ध झाले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने दवाखान्यात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तरुण शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Santosh Munde Death : टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू, डीपीचा फ्यूज बसवताना विजेचा धक्का लागल्यानं अंत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

EPFO Claim Settlements: ईपीएफओनं इतिहास रचला, 10 महिन्यात  5 कोटी दावे मंजूर, 2 लाख कोटी रुपये खातेदारांच्या खात्यात वर्ग
ईपीएफओची दमदार कामगिरी, 5 कोटी दावे मंजूर करत विक्रम, 2 लाख कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा
Rahul Gandhi : पाच महिन्यात 39 लाख मतदार वाढले, पुरुषांपेक्षा अधिक मतदार कसे? कामठीचं गणितही सोडवून सांगितलं; राज ठाकरेंनी चिरफाड केल्यानंतर आता राहुल गांधींकडून डेटा देत 5 गंभीर सवाल!
पाच महिन्यात 39 लाख मतदार वाढले, पुरुषांपेक्षा अधिक मतदार कसे? कामठीचं गणितही सोडवून सांगितलं; राज ठाकरेंनी चिरफाड केल्यानंतर आता राहुल गांधींकडून डेटा देत 5 गंभीर सवाल!
Nashik Crime : नाशिकमधील नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार अन् दगडफेक; परिसरात थरार, हल्लेखोर फरार
नाशिकमधील नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार अन् दगडफेक; परिसरात थरार, हल्लेखोर फरार
Rahul Gandhi : राहुल गांधींकडून महाराष्ट्र निवडणुकीचा थेट डेटा सादर करत गंभीर आरोप अन् पत्रकार परिषद सुरु असतानाच निवडणूक आयोगाला सुद्धा जाग आली! एका क्षणात प्रतिक्रिया देत म्हणाले...
राहुल गांधींकडून महाराष्ट्र निवडणुकीचा थेट डेटा सादर करत गंभीर आरोप अन् पत्रकार परिषद सुरु असतानाच निवडणूक आयोगाला सुद्धा जाग आली! एका क्षणात प्रतिक्रिया देत म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Kesari Kusti : 'उपमहाराष्ट्र केसरी'वर माफीसाठी दबाव, पत्रावर सही करण्यास महेंद्रचा नकारSantosh Bangar on Uddhav Thackeray : 2-3 दिवसात ठाकरेंच्या खासदारांचा शिवसेनेत प्रवेश होईलABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 07 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सThackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ,  मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO Claim Settlements: ईपीएफओनं इतिहास रचला, 10 महिन्यात  5 कोटी दावे मंजूर, 2 लाख कोटी रुपये खातेदारांच्या खात्यात वर्ग
ईपीएफओची दमदार कामगिरी, 5 कोटी दावे मंजूर करत विक्रम, 2 लाख कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा
Rahul Gandhi : पाच महिन्यात 39 लाख मतदार वाढले, पुरुषांपेक्षा अधिक मतदार कसे? कामठीचं गणितही सोडवून सांगितलं; राज ठाकरेंनी चिरफाड केल्यानंतर आता राहुल गांधींकडून डेटा देत 5 गंभीर सवाल!
पाच महिन्यात 39 लाख मतदार वाढले, पुरुषांपेक्षा अधिक मतदार कसे? कामठीचं गणितही सोडवून सांगितलं; राज ठाकरेंनी चिरफाड केल्यानंतर आता राहुल गांधींकडून डेटा देत 5 गंभीर सवाल!
Nashik Crime : नाशिकमधील नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार अन् दगडफेक; परिसरात थरार, हल्लेखोर फरार
नाशिकमधील नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार अन् दगडफेक; परिसरात थरार, हल्लेखोर फरार
Rahul Gandhi : राहुल गांधींकडून महाराष्ट्र निवडणुकीचा थेट डेटा सादर करत गंभीर आरोप अन् पत्रकार परिषद सुरु असतानाच निवडणूक आयोगाला सुद्धा जाग आली! एका क्षणात प्रतिक्रिया देत म्हणाले...
राहुल गांधींकडून महाराष्ट्र निवडणुकीचा थेट डेटा सादर करत गंभीर आरोप अन् पत्रकार परिषद सुरु असतानाच निवडणूक आयोगाला सुद्धा जाग आली! एका क्षणात प्रतिक्रिया देत म्हणाले...
नवी इमारत दीड वर्षांपासून धुळखात पडून; सातारा पोलिसांचा संसार जुन्याच वसाहतीत, पोलीस पत्नींची भावनिक साद
नवी इमारत दीड वर्षांपासून धुळखात पडून; सातारा पोलिसांचा संसार जुन्याच वसाहतीत, पोलीस पत्नींची भावनिक साद
Delhi Vidhansabha Results : दिल्लीतील एक्झिट पोलनंतर भाजपवर निशाणा; 'आप'ने पहिल्यांदाच सांगितला विधानसभा निकालाचा आकडा
दिल्लीतील एक्झिट पोलनंतर भाजपवर निशाणा; 'आप'ने पहिल्यांदाच सांगितला विधानसभा निकालाचा आकडा
Akshay Shinde Encounter : तुम्हाला यायचं तर या, नाहीतर...; अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या भूमिकेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय
तुम्हाला यायचं तर या, नाहीतर...; अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या भूमिकेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय
Ladki bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेची स्क्रूटिनी 15 दिवसांपासून सुरु, 'त्या' 5 लाख लाभार्थ्यांचा आकडा समोर
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, महिला व बाल विकास विभाागकडून स्क्रूटिनी सुरु, 5 लाखांचा आकडा समोर
Embed widget