Glenn Phillips Catch VIDEO : असा कॅच होणे नाही! ग्लेन फिलिप्स झाला सुपरमॅन, डोळ्याचे पारणे फेडणारा झेल पाहाच
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात पाकिस्तान-न्यूझीलंड सामन्याने झाली.

Glenn Phillips Catch Video Mohammed Rizwan : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात पाकिस्तान-न्यूझीलंड सामन्याने झाली. यासामन्यात न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेन फिलिप्सने मोहम्मद रिझवानचा ज्या पद्धतीने झेल घेतला ते पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला जिंकण्यासाठी 321 धावांचे लक्ष्य दिले. पण यजमान संघ अडचणीत सापडलेला दिसतोय. संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान फक्त 3 धावा करून आऊट झाला. जरी त्याची विकेट विल्यम ओ'रोर्कने घेतली असली तरी त्याचे सर्व श्रेय ग्लेन फिलिप्सला जाते.
View this post on Instagram
ग्लेन फिलिप्सने एका हाताने घेतलेला अद्भुत कॅच!
ही आश्चर्यकारक घटना पाकिस्तानच्या फलंदाजीदरम्यान घडली, जेव्हा न्यूझीलंडच्या विल्यम ओ'रोर्कने दहाव्या षटकात गोलंदाजी करत होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, रिझवानने कट शॉट खेळला आणि चेंडू हवेत पॉइंटकडे गेला, जिथे फिलिप्स उभा होता. फिलिप्सने सुपरमॅनसारखी डावीकडे हवेत उडी मारली आणि एका हाताने चेंडू पकडला. त्याचा झेल पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेले सर्व चाहते आश्चर्यचकित झाले. हा व्हिडिओला सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.
THAT IS OUT OF THIS WORLD 😲
— Sports Production (@SSpotlight71) February 19, 2025
Glenn Phillips with an absolute Stunner to dismiss Mohammad Rizwan UNBELIEVABLE pic.twitter.com/9av4IThlag
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो संघासाठी चुकीचा ठरला. विल यंग आणि टॉम लॅथम यांनी शानदार फलंदाजी केली आणि शतके ठोकली. यंगने 113 चेंडूंचा सामना करत 107 धावा केल्या, ज्यात 12 चौकार आणि 1 षटकार होता. त्याच वेळी, लॅथमने 104 चेंडूत नाबाद 118 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 10 चौकार आणि 3 षटकार आले. या डावांच्या मदतीने न्यूझीलंडने पूर्ण षटके खेळल्यानंतर 5 विकेट गमावून 320 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ अडचणीत सापडलेला दिसतो. किवी संघाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानचे 3 बळी घेतले आहेत. यजमानांना जिंकण्यासाठी अजूनही 150+ धावांची आवश्यकता आहे.
हे ही वाचा -





















